शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

1 एप्रिलपासून देशभरात नवे 'कस्टम नियम'; जाणून घ्या, नेमकं काय स्वस्त अन् काय होणार महाग? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:06 IST

Custom Duty Rule Change 1 April 2022 : स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन, इअरबड्सच्या किमतीत बदल होणार आहेत. हा बदल 1 एप्रिल 2022 पासून देशभरात लागू होणार आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात 1 फेब्रुवारी रोजी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटीमध्ये बदल जाहीर केले होते. त्यामुळे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन, इअरबड्सच्या किमतीत बदल होणार आहेत. हा बदल 1 एप्रिल 2022 पासून देशभरात लागू होणार आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोनसह कोणत्या डिव्हाईसेसच्या किंमत किती वाढणार आहे. याविषयी जाणून घेऊया. 

स्मार्टफोन 

मोबाईल फोन चार्जरचे ट्रान्सफॉर्मर पार्ट्स, मोबाईल कॅमेरा मॉड्यूल्सच्या कॅमेरा लेन्सेस आणि इतर उपकरणांवर सरकारने 5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत कस्टम ड्यूटी सूट दिली आहे. अशा प्रकारे, स्मार्टफोन बनवण्याचा खर्च कमी होईल. अशा परिस्थितीत स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोनची किंमत कमी करू शकतात, अशी अपेक्षा आहे.

स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड

सरकारने स्मार्टवॉच उत्पादकांना 31 मार्च 2023 पर्यंत कस्टम ड्युटीमधून सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर देशातील स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडच्या किमतीत घसरण पाहायला मिळू शकते. 

वायरलेस इअरबड्स

सरकारने इअरबड्स निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या भागांच्या आयातीवर शुल्क वाढवले आहे. ज्यामुळे 1 एप्रिलपासून इअरबड्सच्या उत्पादन किंमतीत वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत, युजर्सना वायरलेस इअरबड्स, नेकबँड हेडफोनसाठी अधिक पैसे द्यावे द्यावे लागण्याची शक्यता आहे.

प्रीमियम हेडफोन्स

सरकारने आता हेडफोन्सच्या थेट आयातीवर 20 टक्के अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हा नियम 1 एप्रिलपासून देशभरात लागू करण्यात येत असून यामुळे युजर्सना आयात केलेल्या हेडफोनसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. पण, दुसरीकडे देशात बनवलेल्या हेडफोन्सची मागणी वाढताना दिसत आहे. 

फ्रिज

2022 च्या अर्थसंकल्पात, सरकारने रेफ्रिजरेटर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कंप्रेसर आणि त्याच्या भागांवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. जी 1 एप्रिलपासून लागू होईल. अशा परिस्थितीत 1 एप्रिलपासून रेफ्रिजरेटर उत्पादक देशातील रेफ्रिजरेटरच्या किमती वाढवू शकतात असा अंदाज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन