शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:32 IST

अॅपलने त्याची आयफोन १७ सिरीज ९ सप्टेंबर रोजी लॉन्च केली, ज्यात आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे.

अॅपलने त्याची आयफोन १७ सिरीज ९ सप्टेंबर रोजी लॉन्च केली, ज्यात आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. दरम्यान, आयफोन १७ प्रो मॅक्स हा मॉडेल कॉस्मिक ऑरेंज रंगाच्या पर्यायासह लॉन्च झाला आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून तीन दिवसांतच हा मॉडेल भारत आणि अमेरिकेत आउट ऑफ स्टॉक झाला आहे. आयफोन १७ मालिकेची विक्री १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.

१२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या प्री-ऑर्डरच्या आधारे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आयफोन १७ प्रो मॅक्स आयफोन १७ सिरीजमध्ये सर्वाधिक विकला जाईल. अॅपलने गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये अँटी-रिफ्लेक्टीव्ह आणि प्रोमोशन टेक्नोलॉजीसह ६.९-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 48MP+48MP+48MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १८ मेगापिक्सेलचा सेंटर-स्टेज फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

अहवालांनुसार, ग्राहक मोठ्या प्रमाणात आयफोन १७ प्रो मॅक्सच्या कॉस्मिक ऑरेंज कलरचा पर्याय निवडत आहेत, ज्यामुळे हा कलर आउट ऑफ स्टॉक झाला आहे. हा कलर भारतातील कोणत्याही अ‍ॅपल स्टोअरमध्ये उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे, अ‍ॅपलच्या वेबसाइटवरून प्रो मॅक्स मॉडेल्स पिकअपसह प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध नाहीत. भारतात आयफोन १७ प्रो मॅक्सची सुरुवाती किंमत १ लाख ४९ हजार ९०० पासून सुरू होतो. तर, २ टीबी व्हेरिएंटची किंमत २ लाख २९ हजार ९०० रुपये आहे.

आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्सच्या किंमती पडल्याआयफोन १७ सीरिज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १६ मालिकेतील मॉडेलच्या किंमती पडल्या आहेत. सध्या अ‍ॅमेझॉनवर आयफोन १६ प्रोच्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर मोठी सूट मिळत आहे. त्याची मूळ किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉनवर आयफोन १६ सध्या १ लाख १७ हजार ९०० उपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, ग्राहक २५६ जीबी मॉडेल १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या किंमतीत खरदी करू शकतात. शिवाय, आयफोन १६ प्रो मॅक्सच्या खरदीवरही ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे. या मॉडेलची मूळ किंमत १ लाख ४४ हजार ९०० रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉनवर हा मॉडेल फक्त १ लाख ३२ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनApple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान