शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सॅमसंग इंडिया सरसावली; PM Cares आणि 'या' दोन राज्यांना मिळून २० कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:53 IST

आता मोबाइल, टेलिव्हिजन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अग्रेसर असलेल्या सॅमसंग इंडियानंही कोरोना विरोधातल्या लढाईत योगदान दिलं आहे.

नवी दिल्लीः कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं असून, या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात टाळेबंदी असल्यानं मोदींनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पीएम केअर्स फंडाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी पीएम केअर्स फंडाला मदतीचा हात दिलेला आहे. आता मोबाइल, टेलिव्हिजन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अग्रेसर असलेल्या सॅमसंग इंडियानंही कोरोना विरोधातल्या लढाईत योगदान दिलं आहे. सॅमसंग समूहानं कोरोनासाठी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि तामिळनाडू सरकारला २० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात सॅमसंग इंडियानं केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडाला १५ कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलेले असून, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकारला मिळून पाच कोटींची रक्कम देणार आहे. कंपनीनं एक निवेदनही प्रसिद्धीस दिलेलं असून, त्यात या मदतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या नोएडा प्रशासनाला सॅमसंगनं पाठिंबा दिलेला आहे. तसेच डिजिटल एक्स-रे, डिजिटल अल्ट्रासाऊंडचा पुरवठा करणार असल्याचं सांगितलं आहे.गेल्या काही दिवसांपासून सॅमसंग इंडियाची कोरोना विरोधातील मोहीम अधिक तीव्र झाली आहे, सॅमसंग विविध सरकारे, स्थानिक संस्था आणि आरोग्य सेवा यांच्यासोबत मिळून काम करत आहे. सॅमसंग कंपनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांमार्फत दररोज गरजू लोकांना अन्न पुरवण्यासाठी मदत करत आहे. कंपनीने म्हटले आहे की, सध्या त्यांची सेवा केंद्रे आणि ग्राहक कॉल सेंटर बंद असले तरी ते ऑनलाइन माध्यमांतून ग्राहकांशी जोडलेले राहतील. 

टॅग्स :samsungसॅमसंग