शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

5G स्वस्ताईची स्पर्धा रंगली; Vivo S7e 5G लाँच, Oneplus ला भिडणार

By हेमंत बावकर | Updated: November 4, 2020 18:52 IST

Vivo S7e 5G : व्हिवोचा हा फोन ५जीमधील एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यामुळे वनप्लस नॉर्डला हा फोन टक्कर देण्याची शक्यता आहे.

व्हिवोने परवडणाऱ्या श्रेणीतील पहिलावहिला 5 जी फोन लाँच केला आहे. Vivo S7e 5G आज बाजारात आणत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र, या फोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून ती 11 नोव्हेंबरलाच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वस्तातील 5जी फोन असल्याची बाजारात चर्चा असून असे झाल्यास वनप्लस आणि मोटरोलाला थेट टक्कर मिळणार आहे. 

11 नोव्हेंबरपासूनच या फोनची विक्री सुरु केली जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 720 SoC प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. 4100mAh पावरची बॅटरी देण्यात आली असून 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 

व्हिवोचा हा फोन ५जीमधील एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यामुळे वनप्लस नॉर्डला हा फोन टक्कर देण्याची शक्यता आहे. मोटरोलानेही ५जी फोन लाँच केला होता. सध्या भारतात ५ जी नेटवर्कची ट्रायल सुरु होणार आहे. यामुळे कंपन्यांमध्ये ५जी फोनची स्पर्धा लागली आहे. हे तंत्रज्ञान महाग असल्याने कमीत कमी किंमतीत कोण फोन लाँच करते यावरही कंपन्यांचे लक्ष आहे. यामुळे भारतीय ग्राहकही या फोनकडे आकर्षित होतील अशी आशा या कंपन्यांना आहे. 

Vivo S7e 5G चे स्पेसिफिकेशंसMirror Black, Silver Moon आणि Phantom Blue या तीन रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. 8GB RAM + 128GB या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन येणार आहे. 6.44 इंचाचा full-HD+ डिस्प्ले देण्यात आला असून 1080x2400 पिक्सल रिझोल्युशन आहे. Vivo S7e 5G मध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पाठीमागील कॅमेरामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमर सेन्सर, 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल माइक्रो सेंसर, 2 मेगापिक्सलचा ब्लर इमेज फीचरचा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय 10x digital zoom  फीचरदेखील आहे. USB Type-C port, ब्लूटूथ v5, 5G SA/NSA सारखी फिचर देण्यात आली आहेत. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असून लवकरच या फोनची किंमत समजणार आहे. 

टॅग्स :VivoविवोOneplus mobileवनप्लस मोबाईल