शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:26 IST

Clicks Communicator Launched: नव्या वर्षाच्या सुरुवातीला धमाकेदार स्मार्टफोनची बाजारात एन्ट्री झाली आहे.

एकेकाळी स्मार्टफोन मार्केटमध्ये ब्लॅकबेरी नावाचा दबदबा होता. बिझनेस-क्लास लूक आणि कीबोर्डमुळे हा फोन प्रत्येकाच्या पसंतीस उतरायचा. मात्र, आयफोन आणि अँड्रॉइडच्या लाटेत ब्लॅकबेरी मागे पडली. आता तोच जुना रॉयल अनुभव पुन्हा देण्यासाठी बाजारात एका नव्या स्मार्टफोनची एन्ट्री झाली आहे. हा फोन थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनला टक्कर देत आहे.

क्लिक्स कम्युनिकेटर असे या फोनचे नाव आहे. क्लिक्स कंपनी आतापर्यंत आयफोनसाठी कीबोर्ड केसेस बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. मात्र, आता त्यांनी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा फिजिकल कीबोर्ड, जो तुम्हाला २००० च्या दशकातील ब्लॅकबेरीची आठवण करून देतो. पण हा केवळ जुना फोन नसून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा ट्विस्ट देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ४.०३ इंच AMOLED डिस्प्ले मिळतो.  हा फोन लेटेस्ट Android 16 वर चालतो आणि यात शक्तिशाली MediaTek 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. क्लिक्स कम्युनिकेटरमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २४ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ४००० mAh क्षमता असलेली बॅटरी आहे, जी दीर्घकाळ चालेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या फोनमध्ये आयफोन १५ आणि १६ सिरीजप्रमाणे एक प्रोग्रामेबल साईड बटण दिले आहे. याशिवाय एअरप्लेन मोडसाठी एक स्वतंत्र समर्पित बटण देण्यात आले आहे, जे याला इतर अँड्रॉइड फोनपेक्षा वेगळे ठरवते.

बूक करा अन् ९ हजार वाचवा!

क्लिक्स कम्युनिकेटरची अधिकृत किंमत $४९९ (सुमारे ४५,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही हा फोन आता बूककेला, तर तो तुम्हाला $३९९ (सुमारे ३६,००० रुपये) मध्ये मिळू शकतो. बुकींसाठी ग्राहकांना $१९९ भरावे लागतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Clicks Communicator: Android phone challenges Blackberry and iPhone dominance.

Web Summary : Clicks Communicator, a new Android smartphone with a physical keyboard, challenges Blackberry and iPhone. It boasts a 4.03-inch AMOLED display, Android 16, MediaTek 5G, 50MP camera, and a 4000mAh battery. Pre-booking offers a significant discount.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान