शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

अवघ्या 13500 रुपयांत Realme V11 5G स्मार्टफोन लाँच; Motorolla ला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 18:12 IST

Cheapest 5G smartphone Realme V11: स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते.

चीनच्या ओप्पोची उपकंपनी Realme ने 5G स्मार्टफोन बाजारात धमाका उडवून दिला आहे. मोटरोलाच्या नावावर असलेला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनचा खिताब काढून घेतला आहे. Realme ने आज V सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. (RealMe launches cheapest 5G supported Smartphone in China)

Realme V11 5G हा कंपनीचा आणखी एक परवडणारा 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Realme V11 5G च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत RMB 1,199 म्हणजेच 13,500 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत RMB 1,399 म्हणजेच 15,800 रुपये ठेवण्यात आली आहे. व्हायब्रेंट ब्लू आणि क्वाईट ग्रे कलरमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. 

पेटीपॅक स्मार्टफोन, गॅझेट्स घेतल्या घेतल्या कोणती काळजी घ्यावी? जरूर पहा नाहीतर पस्तावाल...

या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटचा 6.52-इंच (720 x 1600 पिक्सल) IPS LCD डिस्प्ले देण्य़ात आला आहे.  यामध्ये स्क्रीनच्या वरती वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. यामध्ये 5G नेटवर्क सपोर्टसाठी MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस वाढविता येणार आहे. 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगद्नारे वेगाने चार्ज करता येणार आहे. 

गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर

या फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच य़ामध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 11 वर चालणारे Realme UI देण्यात आली आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साईडला देण्यात आला आहे. सध्य़ा हा फोन चीनमध्ये लाँच झालेला आहे. भारतातही लवकरच हा फोन य़ेणार आहे. 

Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच

स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते. परंतु आता कंपनीनं Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. सध्या कंपनीनं भारतात हे फोन केव्हा लाँच केले जातील याची माहिती दिली आहे. परंतु याचा सेल केव्हापासून सुरू होईल याबाबत मात्र पुढील महिन्यातच माहिती देण्यात येणार आहे. मीडिया इनवाईट व्यतिरिक्त रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता भारतात लाँच केले जाणार असल्याची माहिती दिली. 

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइल