शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:54 IST

रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे.

ठळक मुद्देस्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा

मुंबई : रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे.  यासाठी बीएसएनएलने लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन मेकर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे.रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने 4 जी फिचर फोन मार्केटमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही प्रत्यक्षात निर्णय या कंपन्याकडून घेण्यात आला नसल्याचे समजते. मात्र, यामध्ये आता बीएसएनएलने उडी घेतली असून आपल्या ग्राहकांसाठी 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन वेगवेगळ्या ऑफर्ससोबत मार्केटमध्ये घेऊन येणार असल्याचे समजते. बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांच्या माहितीनुसार, स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयच्या रिपोर्टनंतर बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली. या रिपोर्टनुसार, 16 टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे.

एअरटेल आणणार 2500 रुपयांत स्मार्टफोन...रिलायन्स जिओने 4 जी फीचर फोन लॉंच केल्यानंतर एअरटेलने 2500 रुपयांत स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली आहे. एअरटेलचा हा स्मार्टफोन येत्या दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनसह अनेक ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये डाटा आणि कॉलिंग संदर्भात असणार आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइल