Tecno POP 5 LTE ने केली कमाल! 6 हजारांच्या आत आला 5000mAh Battery असलेला फोन 

By सिद्धेश जाधव | Published: November 26, 2021 03:12 PM2021-11-26T15:12:32+5:302021-11-26T15:13:05+5:30

Cheap Phone Tecno POP 5 LTE Price:  Tecno POP 5 LTE फिलिफिन्समध्ये 2GB RAM, 8MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.

Cheap Phone Tecno POP 5 LTE launched with 5000mah battery know specs price  | Tecno POP 5 LTE ने केली कमाल! 6 हजारांच्या आत आला 5000mAh Battery असलेला फोन 

Tecno POP 5 LTE ने केली कमाल! 6 हजारांच्या आत आला 5000mAh Battery असलेला फोन 

googlenewsNext

Cheap Phone Tecno POP 5 LTE: TECNO नं आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या पॉप 5 सीरिज अंतर्गत आला आहे. नवीन मोबाईल फोन Tecno POP 5 LTE सध्या फिलिपिन्स आणि पाकिस्तानमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्वस्त फोन येत्या काही दिवसांत जागतिक बाजारात पदार्पण करू शकतो.  

Tecno POP 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो पॉप 5 एलटीईची बॉडी पॉलिकार्बोनेट अर्थात प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे. यात डॉट नॉच डिजाईन असलेला मिळतो. डिस्प्लेव्हा तिन्ही कडा बेजल लेस आहेत परंतु तळाला रुंद चीन दिसते. या टेक्नो मोबाईलचे Deep Sea Luster आणि Ice Blue असे दोन कलर व्हेरिएंट लाँच झाले आहेत.  

Tecno POP 5 LTE फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड फोन UNISOC SC9863 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी PowerVR GE8322 GPU देण्यात आला आहे. कंपनीनं यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते. 

टेक्नो पॉप 5 एलटीईच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 0.3 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. डिवाइसमधील 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देखील फ्लॅश लाईटने सुसज्ज आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं. टेक्नो पॉप 5 एलटीई मध्ये कंपनीनं 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.  

Tecno POP 5 LTE ची किंमत 

Tecno POP 5 LTE ची पाकिस्तानमध्ये किंमत 15,000 PKR ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6,300 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा टेक्नो फोन भारतात कधी येईल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु भारतात या फोनची किंमत 6,000 रुपयांच्या आसपास असू शकते. असे झाल्यास जियो फोन नेक्स्टला चांगली टक्कर मिळू शकते.  

Web Title: Cheap Phone Tecno POP 5 LTE launched with 5000mah battery know specs price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.