शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

CES 2019 : आपलं जगणं सोपं करण्यासाठी येतेय 'ब्रेडबोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 17:01 IST

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये जगातील सर्वात मोठ्या टेक्नोलॉजीच्या  Consumer Electronics Show (CES) चे आयोजन करण्यात आले आहे. 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील नावाजलेल्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

ठळक मुद्दे8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील नावाजलेल्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.ब्रेडबोट असं या कार्ब वेंडींग मशीनचं नाव असून स्वादिष्ट ब्रेड या मशीनच्या साहाय्याने झटपट तयार करता येतात. सेराफीन या बाराकोडा समूहाच्या कंपनीने डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईसची निर्मिती केली आहे. 

कॅलिफोर्निया - अमेरिकेच्या लास वेगासमध्ये जगातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजीच्या  Consumer Electronics Show (CES) चे आयोजन करण्यात आले आहे. 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील नावाजलेल्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने या शोमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात आले असून ब्रेड तयार करणारी स्वयंचलित मशीन याचं मुख्य आकर्षण ठरली आहे. 

 ब्रेडबोट 

ब्रेडबोट असं या कार्ब वेंडींग मशीनचं नाव असून स्वादिष्ट ब्रेड या मशीनच्या साहाय्याने  झटपट तयार करता येतात. या मशीनच्या मदतीने व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, व्हिट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड अशा सर्व प्रकारचे ब्रेड तयार करता येतात. ब्रेडबोटच्या मदतीने एका तासात मानवाच्या मदतीशिवाय 10 ब्रेड तयार करता येतात. ब्रेड जास्त दिवस खाण्यायोग्य राहावा यासाठी त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह्जचा हमखास वापर केला जातो. मात्र विल्किंसन बेकिंग कंपनीच्या मते ब्रेडबोटच्या ब्रेडमध्ये कमी प्रिझर्व्हेटीव्ह्जची गरज असते. यावर्षाच्या शेवटी याची चाचणी करण्यात येणार आहे. 

डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईस

तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक गोष्टींचा ताण येत असतो. मात्र हा ताण हलका करण्यासाठी तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईस तयार करण्यात आले आहे. सेराफीन या बाराकोडा समूहाच्या कंपनीने डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईसची निर्मिती केली आहे. 

डिजिटल प्रलोभनापासून दूर राहण्यासाठी डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईसची मदत होते. अनेकदा स्मार्टफोनच्या ब्राईटनेसचा डोळ्यांना त्रास होतो. मात्र या डिव्हाईसच्या मदतीने हा त्रास कमी होणार आहे. तसेच रात्रीची झोपही व्यवस्थित असणार आहे. मुई हा 600 डॉलरचा एक लाकडाचा तुकडा आहे.  Google असिस्टंट व्हॉइस कंट्रोल्ससह एक टचस्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये नियमित स्क्रिनपेक्षा अधिक नैसर्गिक इंटरफेस देण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या मदतीने युजर्सना बातम्या आणि हवामानाबाबतची माहिती मेसेजच्या मदतीने लाकडी पाटीवर असलेल्या पांढऱ्या भागावर देण्यात येणार आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :CES 2019सीईएसtechnologyतंत्रज्ञान