5 कॅमेरे असलेला Samsung फोन मिळतोय 8 हजारांत; 6000mAh बॅटरी पुरेल दिवसभर  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:50 AM2022-06-13T11:50:27+5:302022-06-13T11:50:39+5:30

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये 6GB RAM, MediaTek Helio G80 आणि 48MP कॅमेरा आहे. 

Buy Samsung Galaxy F22 In Just 8000 Rupees with 6000mah battery and 5 cameras   | 5 कॅमेरे असलेला Samsung फोन मिळतोय 8 हजारांत; 6000mAh बॅटरी पुरेल दिवसभर  

5 कॅमेरे असलेला Samsung फोन मिळतोय 8 हजारांत; 6000mAh बॅटरी पुरेल दिवसभर  

Next

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला आहेत आहे. त्यामुळे 6GB RAM, MediaTek Helio G80 आणि 48MP कॅमेरा असलेला हा शानदार हँडसेट फक्त 8000 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. हा स्मार्टफोनवर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर डिस्काउंटसह विकला जात आहे. यासाठी तुम्हाला थेट डिस्काउंटसह बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा वापर करावा लागेल.  

Samsung Galaxy F22 वरील ऑफर्स 

Samsung Galaxy F22 स्मार्टफोन भारतात 14,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा हँडसेट फक्त 10,499 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. तसेच सॅमसंगच्या या फोनवर अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 10 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. त्यामुळे तुमची 750 रुपयांची बचत होईल. म्हणजे हा फोन फक्त 9749 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 2000 रुपयांपर्यंतची सहज बचत करू शकता. त्यामुळे Samsung Galaxy F22 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8000 रुपयांपेक्षा देखील स्वस्तात विकत घेता येईल.  

Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स  

सॅमसंग गॅलेक्सी एफ22 मध्ये 6.4-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy F22 फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy F22 मध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Buy Samsung Galaxy F22 In Just 8000 Rupees with 6000mah battery and 5 cameras  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.