कधी पाहिलाय WiFi वर चालणारा गिझर?; Alexa च्या मदतीनं कमांडही देता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:18 PM2022-01-23T23:18:09+5:302022-01-23T23:18:45+5:30

हळूहळू आता सर्वच वस्तू स्मार्ट होऊ लागल्या आहेत. यावर ऑनलाइन मिळतायत अनेक ऑफर्स.

buy geyser from amazon running on wifi and alexa check price discount offer | कधी पाहिलाय WiFi वर चालणारा गिझर?; Alexa च्या मदतीनं कमांडही देता येणार

कधी पाहिलाय WiFi वर चालणारा गिझर?; Alexa च्या मदतीनं कमांडही देता येणार

Next

आजकाल बहुतांश कामं ऑनलाइन केली जातात. स्मार्टफोन व्यतिरिक्त, लोक आता फ्लिपकार्ट (Flipkar), अॅमेझॉन (Amazon) किंवा अन्य ऑनलाइन वेबसाइटद्वारे दररोजच्या वस्तू आणि घरगुती वस्तू ऑर्डर करताना दिसतात. यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीदेखील दिल्या जातात. दरवर्षी असा काही एक काळ असतो तेव्हा त्या त्या वेळी आवश्यक असलेल्या वस्तूंना मोठी मागणी असते. यंदाही हिवाळ्यात काही आवश्यक उत्पादनांवर ऑनलाइन सवलत उपलब्ध आहे. थंडीत अनेकदा वॉर हिटर किंवा गिझर्ससारख्या वस्तूंना मोठी मागणी असते.

वाढती मागणी लक्षात घेऊन amazon ग्राहकांना वेगवेगळ्या 'स्मार्ट गीझर्स'वर चांगल्या ऑफर्स देत आहे. दरम्यान, स्मार्ट गिझरचा अनुभवही निराळा असू शकते, तसंच यात अनेक फीचर्सही मिळत आहेत. हे स्मार्ट फीचर्स गिझर्समध्ये इनबिल्ट वायफाय आणि अॅलेक्सासारखे फीचर्सही मिळतात. असे आपण दोन गिझर्स पाहू जे कमी किंमतीत मिळत आहेत.

Amazon हॅवेल्स गीझरवर सूट देत आहे. गिझरची किंमत २३,८६५ रुपये आहे. मात्र, त्यावर सध्या ३८ टक्के सूट देण्यात येत आहे. ग्राहकांना केवळ १४,८७४ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यात अॅलेक्सा टेक्निकल असिस्टंट आहे, ज्यामुळे तुम्ही फक्त व्हॉइस कमांड देऊ शकता. हा १५ लिटरचा गिझर असून LED इंडिकेटर पाणी किती गरम आहे हे देखील सांगू शकतो. यात टायमर फीचर देखील आहे. आपण ते कोणत्याही तापमानावर देखील सेट करू शकता.

काय आहे ऑफर?
Racold Omnis च्या २५ लिटरच्या गिझरवरही सूट देण्यात येत आहे. या गिझरची किंमत १९,९९० रुपये आहे. Amazon कडून २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सवलत दिली जात असून, ग्राहकांना हा गिझर फक्त १४,८९० रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. म्हणजेच या गिझरवर पाच हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.

स्मार्ट लर्निंग गिझर
हा एक स्मार्ट लर्निंग गिझर आहे. जे वापरात असताना तापमान मॅनेज आणि कंट्रोलही करतं. हा २५ लिटर क्षमतेचा गिझर आहे. तसंच तो वायफायशीही कनेक्ट केला जाऊ शकतो. हा टायटॅनियम स्टील टॅकनं बनलेला असून तो टिकाऊ आहे. यात ऑटो डायग्नोसिस आहे, ज्याद्वारे ते सर्व पॅरामीटर्स आपोआप तपासले जातात. हे तुम्हाचं इलेक्ट्रीक शॉकपासून संरक्षण करतं आणि गिझर त्वरित बंद होतो. या गिझर सोबत २ वर्षांची वॉरंटी दिली जाते आणि टाकीची ७ वर्षांची वॉरंटी आहे. याचं बीईई स्टार रेटिंग ५ आहे.

Web Title: buy geyser from amazon running on wifi and alexa check price discount offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.