शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलिंग, स्टॉकिंग आणि तुम्ही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 05:19 IST

सायबर बुलिंग किंवा स्टॉकिंग, गोपनीयतेवर हल्ला किंवा इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी, आयडेंटिटी थेफ्ट, सिसॅम किंवा चाईल्ड सेक्शुअल ऍब्युसीव्ह मटेरियल, सेक्स टेप रॅकेट या सायबर धोक्यांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची  काळजी घेतली पाहिजे.

- मुक्ता चैतन्य, समाज माध्यमाच्या अभ्यासक, muktaachaitanya@gmail.comसायबर बुलिंग किंवा स्टॉकिंग, गोपनीयतेवर हल्ला किंवा इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी, आयडेंटिटी थेफ्ट, सिसॅम किंवा चाईल्ड सेक्शुअल ऍब्युसीव्ह मटेरियल, सेक्स टेप रॅकेट या सायबर धोक्यांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची  काळजी घेतली पाहिजे.१) खासगी माहिती  सायबर स्पेसमध्ये शेअर करू नका. २) मुलांचा खासगी तपशील, त्यांच्या शाळांच्या/क्लासेसच्या वेळा, आवडीनिवडी, त्यांचं रुटीन  शेअर करू नका.३)  घर कितव्या मजल्यावर आहे, दारं किती आहेत, घरात कधी कोण असतं यासारखे तपशील चुकूनही स्वतः शेअर करू नका आणि हे मुलांनाही सांगा. ४) पासवर्ड म्हणजे स्वतःच नाव, मुलांचं, जोडीदाराचं नाव, जन्म तारखा, लग्नाची तारीख नव्हे. पासवर्ड क्रॅक करायला अवघड जाईल इतपत विचित्र असावा. ५) अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करताना काळजी घ्या. खासगी तपशील, फोटो मागितले तर ती धोक्याची सूचना माना. पासपोर्ट, आधार, पॅनकार्ड किंवा इतरही कागदपत्रांचे तपशील  देऊ नका. ६) अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका. सेक्स टेप रॅकेटमध्ये व्हिडीओ कॉल ब्लॅकमेलिंगचा प्रकार सर्वाधिक होतो. ७) मुलांचे फोटो शेअर करताना अतिसतर्क असा. मुलांच्या फोटोंना प्रचंड लाईक्स, लव्ह, कॉमेंट्स मिळतात, पण त्या फोटोंचा दुरुपयोग होणार नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही.  मुलांचे आंघोळ करतानाचे, नंगेपुंगे फोटो, कितीही क्युट वाटले तरी चुकूनही शेअर करू नका. ८) आपल्या नावाचा दुरुपयोग होतोय, असं लक्षात आल्यास सायबर पोलिसांची मदत घ्या. सोशल मीडियावर अकाऊंट हॅक झाल्याची शंका आली तर लगेच पासवर्ड बदलून पोलिसांकडे तक्रार नोंदवा. ९) कुणीही  ऑनलाईन स्पेसमध्ये असभ्य वर्तन करत असेल तर लगेच रोखा. विरोध झाला नाही की बुलिंग करणाऱ्याची हिंमत वाढते. चेष्टा कुठे संपते आणि बुलिंग कुठे सुरु होतं हे लक्षात घ्या. त्याची सीमारेषा समजून घ्या. १०) एकदा एखादी गोष्ट ऑनलाईन गेली की ती तिथून डिलीट होत नाही. त्यामुळे अपलोड करताना आपण का करतोय? कशासाठी करतोय? त्याचा फायदा-तोटा काय? त्यात किती वेळ जाणार? हे सगळे प्रश्न स्वतःला  विचारा.