शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत  

By सिद्धेश जाधव | Published: January 1, 2022 12:43 PM2022-01-01T12:43:10+5:302022-01-01T12:43:36+5:30

Budget Smartwatch: Noise नं नवीन आणि जबरदस्त स्मार्टवॉच लाँच केला आहे. NoiseFit Caliber नावाच्या या वॉचची खासियत म्हणजे हा शरीराचं तापमान मॉनिटर करू शकतो.  

Budget Smartwatch Noise colorfit caliber launched with spo2 sensor and body temperature monitor  | शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत  

शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत  

googlenewsNext

Budget Smartwatch: Noise आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं बाजारात नवीन स्मार्टवॉच लाँच केला आहे. या स्मार्टवॉचचं नाव NoiseFit Caliber ठेवण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचची किंमत खूप कमी आहे, परंतु तरी यात SpO2 Sensor, Heart Rate Moniter आणि Body Temperature मॉनिटर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टवॉचची किंमत आणि स्पेक्स.  

NoiseFit Caliber चे स्पेसिफिकेशन्स  

NoiseFit Caliber मध्ये 1.69-इंचाची टच स्क्रीन एलसीडी देण्यात आली आहे. यात 150 पेक्षा जास्त कस्टमाइजेबल आणि क्लाउड-बेस्ड वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच हा वॉच 60 स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करतो. हा स्मार्टवॉच 24 तास हार्ट रेट मॉनिटर करतो. तसेच यातील SpO2 सेन्सर रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मॉनिटरिंग करतो. कंपनीनं यात बॉडी टेम्परेचर मॉनिटरिंग फिचरसाठी खास सेन्सर्स दिले आहेत.  

NoiseFit Caliber स्मार्टवॉच Flipkart वर 3-अ‍ॅक्सिस accelerometer सह लिस्ट झाला आहे. तसेच यात स्ट्रेस आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. महिला या स्मार्टवॉचच्या मदतीनं ये Menstrual Cycle देखील ट्रॅक करू शकतात. वॉटर रेसिस्टेंससाठी यात IP68 रेटिंग देण्यात आली आहे. याची बॅटरी सिंगल चार्जवर 15 दिवस चालते, असा दावा कंपनीनं केला आहे.  

NoiseFit Caliber ची किंमत  

या स्मार्टवॉचची विक्री 6 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. लाँच ऑफर अंतर्गत Noise ColorFit Caliber स्मार्टवॉच ई-कॉमर्स साइट Flipkart वरून 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु त्यानंतर हा वॉच 3,999 रुपये देऊन विकत घ्यावा लागेल. Noise ColorFit Caliber ब्लॅक, ग्रीन, रेड आणि व्हाईट अशा रंगात सादर करण्यात आला आहे.  

हे देखील वाचा:

OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश

800 रुपयांच्या आत स्वदेशी कंपनीनं सादर केली 24 तास चालणारी Bluetooth Neckband सीरीज

Web Title: Budget Smartwatch Noise colorfit caliber launched with spo2 sensor and body temperature monitor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.