शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

BSNL चे स्वस्त अन् मस्त प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाचे फायदे! Airtel-Jio साठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:17 IST

BSNL ने कमी किमतीत अमर्यादित कॉलिंग आणि डेटा असलेले प्लॅन लॉन्च केले आहेत.

BSNL News: बऱ्याच काळापासून तोट्यात राहिलेली सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आता हळुहळू नफा कमावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो युजर्स BSNL वर वळत आहेत. बीएसएनएल आपल्या जुन्या ग्राहकांना पुन्हा कनेक्ट करण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अतिशय परवडणारे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. 

१४७ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् इंटरनेट डेटा

BSNL चा १४७ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना इंटरनेटपेक्षा जास्त कॉलिंगची आवश्यकता आहे. या प्लॅनमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. इतकेच नाही तर ते १० जीबी इंटरनेट डेटा देखील मिळेल, जो तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही वापरू शकता. तुम्ही सर्व डेटा एका दिवसात वापरू शकता किंवा एका महिन्यापर्यंत हळूहळू वापरू शकता.

२४७ रुपयांचा प्लॅन डेटा प्रेमींसाठी उत्तम पर्याय 

तुमची गरज फक्त कॉलिंगपुरती मर्यादित नसेल आणि तुम्ही इंटरनेटचाही जास्त वापर करत असाल, तर बीएसएनएलचा २४७ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता देखील आहे, परंतु त्यासोबत तुम्हाला ५० जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. विशेष म्हणजे डेटा वापरासाठी कोणतीही दैनिक मर्यादा नाही. तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा एकाच वेळी हवा तितका डेटा वापरू शकता.

जिओ आणि एअरटेलसाठी धोक्याची घंटा?

बीएसएनएलचे हे प्लॅन त्यांच्या किमतीच्या तुलनेत प्रचंड मूल्य देतात. खाजगी कंपन्या डेटा आणि कॉलिंगसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे आकारत असताना, बीएसएनएल आपल्या ग्राहकांना कमी किमतीत चांगले पॅकेज देत आहे. जर बीएसएनएलने त्यांच्या नेटवर्कची गुणवत्ता थोडी अधिक सुधारली, तर ते एअरटेल आणि जिओसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरेल. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओ