सध्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ट्रू-कॉलर हे अॅप आहे. या अॅपमुळे आपल्याला मोबाईल नंबर कोणाचा आहे याची माहिती मिळते. या हे अॅप वारण्याची गरज नाही, यासाठी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल सीएनएपी आणणार आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या आधीच सीएनएपी यावर काम करत आहे. बीएसएनएलसाठी आधीच डिप्लॉय केले आहे. ते आता झोन-निहाय इंटीग्रेशन सुरू आहे.
Samsung Galaxy S24: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस २४; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
इंटीग्रेशनला अजूनही वेळ लागणार आहे. इंटीग्रेशननंतर तीन ते चार महिन्यांत बीएसएनएलसाठी सीएनएपीची अंमलबजावणी पूर्ण होईल. एकदा सीएनएपी सेवा सुरू झाल्यावर, कॉलरचा नंबर त्यांच्या फोनमध्ये सेव्ह केलेला नसला तरीही, ग्राहकांना त्यांना कोण कॉल करत आहे हे पाहता येणार आहे. याची अंमलबजावणी खाजगी दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच केली आहे.
स्पॅम कॉलवर यामुळे आळा बसू शकतो
ट्रूकॉलरसह तृतीय-पक्ष ॲप्लिकेशन्स आधीपासूनच क्राउडसोर्स्ड डेटावर आधारित सेवा पुरवतात, पण हा डेटा कधीकधी चुकीचा असू शकतो. स्पॅम संदेश आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांना प्रतिसाद म्हणून CNAP सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पॅम आणि फसवणुकीमुळे डिजिटल अटक आणि इतर तत्सम घटनांमुळे आर्थिक नुकसानही झाले आहे.
Web Summary : BSNL will launch CNAP, a service revealing caller ID even if the number isn't saved. Aimed at curbing spam, it addresses inaccuracies of apps like Truecaller. Integration is underway, expecting launch in 3-4 months, following private telecom's implementation.
Web Summary : बीएसएनएल सीएनएपी लॉन्च करेगा, जो नंबर सेव न होने पर भी कॉलर आईडी बताएगा। स्पैम रोकने के उद्देश्य से, यह ट्रूकॉलर जैसे ऐप्स की गलतियों को दूर करता है। एकीकरण जारी है, निजी टेलीकॉम के बाद 3-4 महीनों में लॉन्च होने की उम्मीद है।