शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:28 IST

BSNL कडे आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. कंपनी युजर्सना स्वस्त आणि महागडे दोन्ही प्रकारचे प्लॅन ऑफर करते.

नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. BSNL ही आपल्या युजर्ससाठी विविध किंमतींच्या श्रेणीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. खाजगी कंपन्या Jio, Airtel आणि Vi यांनी आपल्या चार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर BSNL चे चांगले दिवस पुन्हा एकदा परतले आहेत. 

BSNL कडे आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. कंपनी युजर्सना स्वस्त आणि महागडे दोन्ही प्रकारचे प्लॅन ऑफर करते. तसेच, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक जास्त व्हॅलिडिटी असलेले प्लॅन उपलब्ध आहेत. दरम्यान, BSNL चे असे तीन प्लॅन आहेत. ज्यात जास्त व्हॅलिडिटी मिळते. त्यामुळे BSNL ने अनेक खाजगी कंपन्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. या तीन प्लॅनबद्दल जाणून घ्या.... 

BSNL चा १५० दिवसांचा प्लॅनBSNL आपल्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना १५० दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. या रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला ५ महिने रिचार्ज करण्याची गरज नाही. BSNL च्या या प्लॅनची ​​किंमत ३९७ रुपये आहे. या प्लॅनमध्ये पहिल्या ३० दिवसांसाठी फ्री कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच, युजर्सना ३० दिवसांसाठी दररोज १०० फ्री एसएमएस देखील मिळतील.

BSNL चा १६० दिवसांचा प्लॅनBSNL चा असा एक रिचार्ज प्लॅन आहे. ज्यामध्ये युजर्सना १६० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यासाठी युजर्सना ९९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनद्वारे तुम्ही १६० दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता. यासोबतच, कंपनी या प्लॅनमध्ये युजर्स दररोज २ जीबी डेटा देखील देत आहे. जर तुम्हाला मोफत कॉलिंग आणि डेटा असलेला प्लॅन हवा असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता.

BSNL चा १८० दिवसांचा प्लॅनBSNLच्या पोर्टफोलिओमध्ये १८० दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन देखील मिळत आहे. या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत ८९७ रुपये आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला १८० दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये एकूण ९० जीबी डेटा दिला जातो. तसेच, या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटा सोबतच दररोज १०० फ्री एसएमएस देखील मिळतील.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल