शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा स्मार्टफोन, दिवाळीत लॉंच होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 15:57 IST

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. 

ठळक मुद्देबीएसएनएलचा 2 हजार रुपयांत स्मार्टफोनदिवाळीत लॉंच होण्याची शक्यताएअरटेल सुद्धा आणणार 2500 रुपयांत स्मार्टफोन

मुंबई, दि. 19 -  सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने 4 जी फिचर फोन मार्केटमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही प्रत्याक्षात निर्णय या कंपन्याकडून घेण्यात आला नसल्याचे समजते. मात्र, यामध्ये आता बीएसएनएलने उडी घेतली असून आपल्या ग्राहकांसाठी दोन हजार रुपयांचा स्मार्टफोन मार्केटमध्ये येत्या दिवाळीत घेऊन येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ईटीटेलिकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनीकडून नवीन स्मार्टफोन बाजारात उतरण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. हा स्मार्टफोन साधारण महिन्याभरात बाजारात उतरण्यात येईल. अनेक उत्पादन कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले. बीएसएनएलबरोबर भागीदारी करण्यास मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय स्मार्टफोन कंपन्या इच्छुक आहेत. बीएसएनएलकडून ग्राहकांना व्हॉईस पॅक आणण्यात येणार आहे, असेही अनुपम श्रीवास्तव म्हणाले. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये कोणत्या सुविधा असतील याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. 

एअरटेल आणणार 2500 रुपयांत स्मार्टफोन...रिलायन्स जिओने 4 जी फीचर फोन लॉंच केल्यानंतर एअरटेलने 2500 रुपयांत स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली आहे. एअरटेलचा हा स्मार्टफोन येत्या दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनसह अनेक ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये डाटा आणि कॉलिंग संदर्भात असणार आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइल