शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
3
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
4
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
5
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
6
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
7
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
9
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
10
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
11
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
12
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
13
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
14
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
15
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
16
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
17
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
18
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
19
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
20
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान

अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:59 IST

BSNL 4G Launch: बीएसएनएलने गेल्या वर्षभरापासूनच फोरजी रेडी क्षमतेची सिमकार्ड वाटण्यास सुरुवात केलेली आहे. परंतू, प्रत्येक वेळेला फोरजी सेवा सुरु करण्याचा मुहूर्त टळला जात होता. यंदा १५ ऑगस्टची तारीखही हुकली होती.

आज येईल, उद्या येईल असे करता करता बीएसएनएल ४जी नेटवर्कच्या लाँचिंगचा मुहूर्त ठरला आहे. २७ सप्टेंबरला बीएसएनएल देशभरात फोरजी सेवा सुरु करत आहे. याबाबतची घोषणा बीएसएनएलने एक्स अकाऊंटवरून केली आहे. 

बीएसएनएलने गेल्या वर्षभरापासूनच फोरजी रेडी क्षमतेची सिमकार्ड वाटण्यास सुरुवात केलेली आहे. परंतू, प्रत्येक वेळेला फोरजी सेवा सुरु करण्याचा मुहूर्त टळला जात होता. यंदा १५ ऑगस्टची तारीखही हुकली होती. अखेर आता २७ सप्टेंबरला फोरजी सेवा सुरु करत असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे. 

अजूनही बीएसएनलची सेवा सो-सोच आहे. फोन आला तर उचलण्यापूर्वीच कट होत आहे, बोलण्यास सुरुवात केली तर समोरच्याचा आवाज आपल्याला आणि आपला आवाज समोरच्याला ऐकायला येत नाहीय. इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही तर फोनमध्ये रेंजचे देखील वांदे आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन  या कंपन्यांनी त्यांची रिचार्ज महाग केली आहेत. अर्थात या कंपन्या ग्राहकांना फोरजी, फाईव्ह जी सेवा देत आहेत. तर बीएसएनएल अजूनही रडतखडत थ्री जी सेवाच देत आहे. यामुळे गावखेड्यातील ग्राहक बीएसएनएलच वापरत आहेत.

या लोकांना आता बीएसएनएल फोरजीचा फायदा होणार आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जे रवी यांनी बीएसएनएल ४जी सेवा देशव्यापी लाँच करण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएलची फोरजी सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिमकार्ड फोरजीमध्ये बदलून घ्यावे लागणार आहे. तसेच फोरजी फोन घ्यावा लागणार आहे. कंपनी रिचार्जचे दर वाढविणार की नाही, हे अद्याप समोर आलेले नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : BSNL 4G launch finally confirmed nationwide on September 27th.

Web Summary : BSNL is launching its 4G service across India on September 27th. After repeated delays, the state-owned telecom provider aims to upgrade its network. Customers need a 4G SIM and phone. Pricing details are awaited. This upgrade promises better connectivity for rural users.
टॅग्स :BSNLबीएसएनएल