शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

BSNL च्या 4G सेवांच्या लाँचची झाली घोषणा; खासगी कंपन्यांची साथ सोडणार का ग्राहक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 14:01 IST

BSNL 4G Services : दूरसंचार राज्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बीएएनएलची ४जी सेवा केव्हा लाँच केली जाईल, याची माहिती दिली. 

BSNL 4G Services : सध्या खासगी क्षेत्रातील सर्वच दूरसंचार कंपन्या ४ जी सेवा पुरवत आहेत. परंतु सरकारच्या अधिपत्याखालील BSNL आणि MTNL या कंपन्या मात्र अद्यापही २जी आणि ३ जी सेवा पुरवत आहेत. अनेकांकडून बीएसएनएल ४ जी सेवांना कधी सुरुवात करणार असाही प्रश्न विचारला जात होता. काही दिवसांपूर्वी खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea), रिलायन्स जिओ (Reliance Jio) या कंपन्यांनी २० ते २५ टक्क्यांपर्यंत आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर रोष व्यक्त करत सोशल मीडियावर बीएसएनएलला साथ देण्याची मागणीही केली होती. 

यादरम्यान, बीएएनएलच्या ४ जी सेवांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या ४ जी सेवा या सप्टेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण देशात लाँच करण्यात येणार आहेत. दरम्यान, दूरसंचार राज्यमंत्र्यांनी संसदेत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच बीएसएनएलला ४ जी सेवांद्वारे ९०० कोटी रूपयांपर्यंतच्या महसूलाची अपेक्षा आहे.

९०० कोटींचा महसूलबीएसएनएलची ४ जी सेवा ही खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांसाठी स्पर्धेपेक्षा कमी ठरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार दूरसंचार राज्यमंत्र्यांना ४जी सेवा रोलआऊट करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना बीएसएनएलनं सप्टेंबर २०२२ पर्यंतची वेळ ठरवली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच देशभरात एकत्र ४ जी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षात बीएसएनएलला ९०० कोटी रूपयांचा महसूल मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. 

४जी अपग्रेडसाठी मंजुरीकाही दिवसांपूर्वीच ४जी अपग्रेडेशनसाठी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएट (NSCS) ची परवानगी मिळाली आहे. परंतु ४जी साठी नोकियाच्या पार्ट्सना सरकारनं असुरक्षित सांगत ते फेटाळून लावलं. बीएसएनएल पूर्णपणे मेड इन इंडिया पार्ट्सचा वापर करावा अशी सरकारची इच्छा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर खासगी कंपन्यांबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु खरंच हे बीएसएनएलला पाठिंबा देण्यासाठी आहे का हे त्यांची सेवा लाँच झाल्यानंतरच कळणार आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ