शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:52 IST

BSNL : दूरसंचार नियामक ट्रायच्या (टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

नवी दिल्ली : बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीला आता अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अलिकडेच केलेल्या दरवाढीनंतर मोठ्या संख्येने ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत. 

दूरसंचार नियामक ट्रायच्या (टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये कमी दर आणि 4-जी सेवांचे ‘सॉफ्ट लाँच’ हे देखील आहे. बीएसएनएलने जुलैमध्ये सुमारे 30 लाख नवीन ग्राहक जोडले तर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. 

यात प्रामुख्याने एअरटेलने 17 लाख युजर्स गमावले, तर व्होडाफोन आयडियाने 14 लाख आणि जिओने 8 लाख युजर्स गमावले आहे. ऑगस्ट महिन्यामध्येही बीएसएनएल ही एकमेव कंपनी होती.जिच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. बीएसएनएलने या महिन्यात २५ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. या कालावधीत जिओने 40 लाख, एअरटेलने 24 लाख आणि व्होडा आयडियाचे 19 लाख वापरकर्ते गमावले आहे. 

दरम्यान,एकूणच बीएसएनएलचा बाजारातील वाटा हा तिच्या खासगी प्रतिस्पर्धींच्या तुलनेत खूप कमी आहे. या वर्षी ऑगस्टच्या अखेरीस जिओ 40.5 टक्के मार्केट शेअरसह आघाडीवर आहे. तर एअरटेलचा मार्केट शेअर 33 टक्के आणि व्होडाफोन आयडीयाचा शेअर 18 टक्के आहे. ट्रायने सांगितले की, बीएसएनएलचा हिस्सा सध्या 7.8 टक्के आहे. एमटीएनएलचा 0.2 टक्के स्टेक देखील यात जोडला तर तो 8 टक्के होतो.

बीएसएनएलचे रिचार्ज दर सर्वात कमीबीएसएनएलचे रिचार्ज दर सर्वात कमी आहेत.हे प्रति युजर्स सरासरी महसूल (ARPU) स्कोअरद्वारे सिद्ध होतात.एअरटेलचा एआरपीयू 211 रुपये, जिओचा 195 रुपये आणि व्होडाफोन आयडियाचा 146 रुपये आहे. त्या तुलनेत बीएसएनएलचा एआरपीयू सुमारे 90 रुपये इतका आहे. ही सरकारी कंपनी ग्राहकांकडून सर्वात कमी दर आकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी दराचे एक कारण म्हणजे कंपनीने अद्याप अधिकृतपणे हाय-स्पीड 4-जी लाँच झालेले नाही. दुसरीकडे, जिओ आणि एअरटेलसारख्या खासगी ऑपरेटरने त्यांच्या वापरकर्त्यांचा मोठा भाग 5-जी वर ट्रान्सफर केला आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)AirtelएअरटेलJioजिओ