शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

युटीएस अॅपवर सामान्य तिकिटेही आरक्षित करा...पण ही काळजीदेखील घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 15:52 IST

भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी युटीएस अॅपवर सुविधा सुरु केली आहे.

भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी युटीएस अॅपवर सुविधा सुरु केली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडक्यांवर लागणारी रांग कमी होणार आहे. या अॅपद्वारे केवळ काही शहरामध्येच तिकिटे काढण्याची सुविधा उपलब्ध होती. भारतीय रेल्वेने याआधी देशातील 15 रेल्वे झोनमध्ये ही सुविधा उपलब्ध केली होती. या अॅपद्वारे आता देशातील लांबच्या रेल्वे प्रवासासाठीही तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. यामुळे मोठ्या शहरांमधील रांगा कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे. या UTS on Mobile अॅपद्वारे कसे तिकीट आरक्षण करता येईल, हे पाहुया.

प्रथम स्मार्टफोनमध्ये प्लेस्टोअरवरून UTS on Mobile हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यानंतर प्रवाशाला त्याचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता नोंदवावा लागणार आहे. यानंतर प्रवास सुरु करण्याचे स्थानक आणि अंतिम स्थानकाचे नाव अॅपवरील रकान्यात टाकावे लागणार आहे. यानंतर रेल्वे डिजिटल वॉलेट किंवा पेटीएम, मोबीक्विक या वॉलेटद्वारे तिकिटाचे पैसे भरून तिकिट आरक्षित करावे लागणार आहे. 

तिकिट आरक्षित करताना एक गोष्ट महत्वाची अशी की, रेल्वे स्थानकापासून कमीतकमी 20 मीटर लांब राहूनच तिकिट काढता येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या आवारात तिकिट काढता येणार नाही. तसेच या तिकिटासाठी पेपरलेस आणि प्रिंट असे दोन पर्याय असणार आहे. प्रिंट पर्याय निवडल्यास मोबाईलवरील तिकीट अवैध असणार आहे. 

याशिवाय हे तिकिट प्रवासाच्या दिवशीच काढता येणार आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या अॅपवरील तिकीटाचा स्क्रीन शॉट काढता येत नाही. यामुळे प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे हा मोबाईल असणे गरजेचे आहे. तसेच एकदा रजिस्टर केलेला मोबाईलवर दुसरा नंबर किंवा दुसऱ्या मोबाईलवर युटीएस अॅपवरील नंबर रजिस्टर होऊ शकत नाही. यासाठी अॅप डिलीट करण्याआधी पहिला नंबर डिरजिस्टर करावा लागणार आहे. 

तिकिट काढल्यानंतर तपासणीसाला दाखविण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. शो बुक्ड तिकिट या ऑप्शनवर गेल्यास आरक्षित केलेले तिकिट दिसणार आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी