शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

अरे वाह! Smartwatch वर Live Cricket! Boat नं केली कमाल, इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: March 15, 2022 17:39 IST

boAt नं नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे, ज्यात SpO2 सेन्सर आणि IP67 रेटिंग देण्यात आली आहे.  

boAt नं भारतात boAt Wave Pro 47 नावाचं नवीन स्मार्टवॉच सादर केलं आहे. यातील 47 हा नंबर भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या साल 1947 चं प्रतीक आहे. यात SpO2 सेन्सर आणि IP67 रेटिंग असे फीचर्स मिळतात. परंतु यातील लाईव्ह क्रिकेट स्कोर फिचर जास्त चर्चेत आहे. हे वॉच ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं boAt Wave Pro 47 ची किंमत 3,199 रुपये ठेवली आहे. याची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल.  

boAt Wave Pro 47 चे स्पेसिफिकेशन्स 

BoAt Wave Pro 47 स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा चौकोनी टच-स्क्रीन डिस्प्ले मिळतो. हा कलर डिस्प्ले 500 निट्स च्या पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. भारतीयांसाठी यात अनेक खास वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच यात लाईव्ह क्रिकेट स्कोर फीचर देखील मिळतं. ज्याच्या मदतीनं ODI, T20, IPL इत्यादी सर्व प्रकारच्या क्रिकेट सामान्यांचा स्कोर बघता येईल. यासाठी स्मार्टवॉच फोनशी कनेक्टड असणं आवश्यक आहे.  

या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 सेन्सर, पेडोमीटर, स्लीप ट्रॅकर सारखे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात. यात शरीराचं तापमान सांगण्यासाठी टेम्परेचर मॉनिटर देखील आहे. या घड्याळात अनेक स्पोर्ट्स मोड आहेत. याची IP67 वॉटर आणि डस्ट-रेजिस्टन्स रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. सिंगल चार्जमध्ये या स्मार्टवॉचची बॅटरी 7 दिवस चालते, असा दावा boAt नं केला आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य