शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch, सिंगल चार्जवर 7 दिवस चालणार  

By सिद्धेश जाधव | Updated: March 30, 2022 12:52 IST

boAt Wave Lite स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.

boAt Wave Lite स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. अ‍ॅमेझॉनवरून या स्मार्टवॉचची किंमत समजली आहे. हे नवीन नवीन स्मार्टवॉच तुम्ही 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या वॉचची विक्री 31 मार्चला दुपारी 12 वाजता सुरु करण्यात येईल. अ‍ॅमेझॉनवर boAt Wave Lite चे ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर व्हेरिएंट उपलब्ध होतील.  

Boat Wave Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

बोट व्हेव लाईटमध्ये 1.69-इंचाची चौकोनी स्क्रीन देण्यात आली आहे. जी 500nits ब्राईटनेस आणि 160-डिग्री व्यूइंग अँगलला सपोर्ट करतात. याची डिजाईन अशी आहे की याच स्मार्टवॉचचं वजन फक्त 44.8 ग्राम आहे. यातील फीचर्स आणि अन्य गोष्टी अ‍ॅक्सेस करण्यासाठी कंपनीनं बाजूला रोटेटिंग क्राउन दिला आहे.  

या बोट वॉचमधील 100 पेक्षा जास्त वॉच फेस तुम्हाला कस्टमायजेशनमध्ये मदत करतात. यात 24/7 हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल आणि स्लिप ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. boAt Wave Lite मध्ये दहा स्पोर्ट्स मोड मिळतात, ज्यात धावणे, चालणे, सायकलिंग, योग, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, स्किपिंग, हायकिंग आणि स्विमिंगचा समावेश आहे. यात Google Fit आणि Apple Health इंटीग्रेशन सपोर्ट मिळतो. सिंगल चार्जवर बोट वेव लाईट 7 दिवस चालू शकतात. असा दावा कंपनीनं केला आहे. हे स्मार्टवॉच IP67 डस्ट आणि वॉटर-रेजिस्टन्ससह बाजारात आलं आहे.  

 
टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य