शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

ब्लॅकबेरी मोशन स्मार्टफोनची घोषणा; नव्या फिचर्सचा फोन लवकरच येणार ग्राहकांच्या भेटीला

By शेखर पाटील | Updated: October 10, 2017 08:42 IST

टिसीएल कंपनीने जागतिक बाजारपेठेत ब्लॅकबेरी मोशन हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देटिसीएल कंपनीने जागतिक बाजारपेठेत ब्लॅकबेरी मोशन हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. ब्लॅकबेरी कंपनीची खासियत असणारे अनेक फिचर्स असतील. कबेरी कंपनीचे स्मार्टफोन त्यातील क्वार्टी कि-पॅड आणि सुरक्षाविषयक फिचर्ससाठी ख्यात आहेत.

टिसीएल कंपनीने जागतिक बाजारपेठेत ब्लॅकबेरी मोशन हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. यात ब्लॅकबेरी कंपनीची खासियत असणारे अनेक फिचर्स असतील. ब्लॅकबेरी कंपनीचे स्मार्टफोन त्यातील क्वार्टी कि-पॅड आणि सुरक्षाविषयक फिचर्ससाठी ख्यात आहेत. मात्र ही कंपनी काळाच्या ओघात आणि खरं तर अन्य कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू शकली नाही. यामुळे याच्या स्मार्टफोनचा ब्रँड टिसीएल या चीनी कंपनीला विकण्यात आला आहे. आता टिसीएल या कंपनीनेच ब्लॅकबेरी मोशन या नावाने नवीन स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत ब्लॅकबेरी किवन या नावाने मॉडेल लाँच करण्यात आले होते. यातील काही फिचर्स ब्लॅकबेरी मोशनमध्ये आहे. मात्र यातील सर्वात लक्षणीय फिचर अर्थात फिजीकल बटनांनी युक्त असणार्‍या क्वार्टी कि-पॅडला यातून वगळण्यात आले आहे. याऐवजी यात ५.५ इंच आकारमानाचा पूर्ण टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. विशेष म्हणजे या डिस्प्लेच्या खाली ‘होम’ हे फिजीकल बटन दिलेले आहे. यावर क्लिक करून युजर सहजपणे होम स्क्रीनवर पोहचू शकतो. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते तब्बल दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची व्यवस्था आहे.

ब्लॅकबेरी मोशन या मॉडेलमध्ये एफ/२.० अपार्चर व ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसह १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून याच्या मदतीने ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या स्मार्टफोनच्या समोरील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारा असेल. यात क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.

ब्लॅकबेरी मोशन या मॉडेलमध्ये सुरक्षाविषयक अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. यात ब्लॅकबेरी कंपनीच्या ‘डीटीईके सिक्युरिटी सुट’चा समावेश आहे. याशिवाय यात अँड्रॉइड फॉर वर्क, गुगल प्ले फॉर वर्क हे फिचर्स असतील. तर या स्मार्टफोनमध्ये एनक्रिप्शनचे अभेद्य कवच देण्यात आले आहे. यामुळे याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या संदेशांचे वहन हे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेतील या स्मार्टफोनचे मूल्य ४६० डॉलर्स असून लवकरच हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे.

ब्लॅकबेरी मोशन या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, युएसबी टाईप-सी आदी फिचर्स असतील.