शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

आतापर्यंतच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येऊ शकतो Black Shark 4S Pro; जाणून घ्या स्पेक्स  

By सिद्धेश जाधव | Updated: October 5, 2021 16:42 IST

Black Shark 4s Pro Gaming Phone specs: कंपनीने यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro हे दोन गेमिंग फोन्स सादर केले होते. आता कंपनी या फोन्सच्या अपग्रेड व्हर्जन Black Shark 4S आणि 4S Pro वर काम करत आहे.

शाओमी सब-ब्रँड Black Shark ने काही दिवसांपूर्वी आपल्या दोन नवीन Gaming Phones ची घोषणा केली होती. कंपनी लवकरच Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro हे दोन फोन्स बाजारात घेऊन येणार आहे. यातील Black Shark 4S Pro च्या स्पेसिफिकेशन्स माहिती चिनी टिपस्टरने दिली आहे. लीकनुसार हा फोन क्वॉलकॉमच्या शक्तिशाली Snapdragon 888 Plus चिपसेटसह ग्राहकांच्या भेटीला येईल.  

कंपनीने यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro हे दोन गेमिंग फोन्स सादर केले होते. आता कंपनी या फोन्सच्या अपग्रेड व्हर्जन Black Shark 4S आणि 4S Pro वर काम करत आहे. यातील प्रो मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ सह सादर केला जाईल. तसेच या फोनमधील डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याफोनमधील बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

Black Shark 4 आणि 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Black Shark 4 आणि 4 Pro मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. Black Shark 4 मध्ये Snapdragon 870 चिपसेट आणि Pro मॉडेलमध्ये Snapdragon 888 देण्यात आला आहे. हे गेमिंग स्मार्टफोन 16GB पर्यंतच्या RAM आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह बाजारात आले आहेत. अँड्रॉइड 11 सह येणाऱ्या या गेमिंग स्मार्टफोन फिजिकल पॉप-अप गेमिंग ट्रिगर बटन्स देण्यात आले आहेत. 

दोन्ही फोन 20-MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. Black Shark 4 स्मार्टफोनमध्ये 48MP + 8MP (अल्ट्रावाईड) + 5MP (मॅक्रो) असा रियर कॅमेरा सेटअप आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 64MP + 8MP (अल्ट्रावाईड) + 5MP (मॅक्रो) असे कॅमेरा सेन्सर मिळतात. दोन्ही मॉडेलमध्ये 4,500mAh ची बॅटरी, 120W रॅपिड चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान