शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Airtel चा शानदार प्लॅन, कमी किमतीत दररोज 2.5GB डेटा आणि बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 09:10 IST

Airtel : आता एअरटेलने देशभरातील आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे. हा प्लॅन युजर्ससाठी OTT फायदे देखील देतो.

एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या, त्यानंतर लोकांना महागाईचा फटका बसला होता. आता कंपन्या हळूहळू कमी किमतीच्या योजना आणत आहेत. आता एअरटेलने देशभरातील आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे. हा प्लॅन युजर्ससाठी OTT फायदे देखील देतो. तसेच, एअरटेलच्या या प्लॅनवर युजर्संना भरपूर डेटासह मिड-टर्म व्हॅलिडिटी मिळते आणि यामुळेच जास्त डेटा युजर्ससाठी एक चांगला पर्याय असू शकतो. 

एअरटेलचा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन नुकताच सादर करण्यात आला आणि हा एक मोठा डेटा प्लॅन आहे, जो युजर्संना मिड-टर्म व्हॅलिडिटीच्या पर्यायासाठी केंद्रित आहे. एअरटेलच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5GB रोजच्या डेटासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. युजर्संना या प्लॅनसह ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील मिळतात.

99 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात अनेक फायदे!सर्वात आधी यामध्ये 84 दिवसांच्या Amazon प्राइम मेंबरशिपचा समावेश आहे, जो तुम्हाला प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक आणि इतर Amazon प्राइम अॅप्सच्या संचमध्ये प्रवेश देते. त्यानंतर  Airtel Xstream Mobile Pack मध्ये देखील प्रवेश आहे, ज्याद्वारे युजर्स कोणत्याही एका Xstream चॅनेलमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवेश करू शकतात. Apollo 24x7 Circle, Shaw Academy, Fastag Cashback, Free HelloTunes आणि  Wink Music यासह इतर एअरटेल थँक्स फायदे देखील दिले आहेत.

एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅनएअरटेलने ऑफर केलेला हा पहिला 2.5GB रोजचा डेटा प्रीपेड प्लॅन नाही. युजर्स 449 रुपयांमध्ये असाच दुसरा प्लॅन मिळवू शकतात. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे याची व्हॅलिडिटी केवळ 28 दिवसांची आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये Amazon प्राइम सब्सक्रिप्शन दिले जात नाही. मात्र, एअरटेल थँक्स फायदे आहेत, ज्यात Amazon Prime Video Mobile Edition ची एक महिन्याची (30 दिवस) फ्री ट्रायलचा समावेश आहे.

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय