शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सावधान ! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय

By अनिल भापकर | Updated: February 17, 2018 19:26 IST

या टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. त्यामुळे मोबाईल वर बोलताना आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी असे बोललोच नव्हतो असे चालत नाही . कारण समोरचा लगेच तुमच्यासोबत झालेले संभाषण तुम्हाला ऐकवतो . त्यासाठी अनेक कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगले अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप म्हणजे अ‍ॅटोमेटीक कॉल रेकॉर्डर हे होय.

ठळक मुद्देया टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. मोबाईल वर बोलताना नेहमी काळजी घ्या ,आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी असे बोललोच नव्हतो असे चालत नाही . कारण समोरचा लगेच तुमच्यासोबत झालेले संभाषण तुम्हाला ऐकवतो .तुमचा काही व्यवसाय आहे आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांशी बोलून फिडबॅक घेता. अशावेळी अनेक तक्रारी ग्राहक करता. या सर्व तक्रारी ज्या तुमच्या स्मार्टफोनवर अ‍ॅटोमॅटिक रेकॉर्ड होतील त्या तुम्ही तुमच्या टिमला ऐकवून तुमच्या ग्राहकाला समाधानी करू शकता.

पूर्वी एखाद्याच्या लँडलाईन किंवा मोबाईलवर जर काही धमकीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे फोन कॉल्स येत असतील तर पोलिसांत तक्रार केल्यानंतरे कॉल रेकॉर्ड करण्याची व्यवस्था या यंत्रणेकडून केली जात असे. त्यासाठी विशेष तांत्रिक व्यवस्थाही वापरण्यात येत असत. तेव्हा कुठे येणारे कॉल्स रेकॉर्ड केले जात. त्यानंतरच्या काळात कॉल रेकॉर्डिंगचे अनेक मशीन निघाले तसेच त्याहीनंतर अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंग केली जाऊ लागली. आता मात्र या टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. त्यामुळे मोबाईल वर बोलताना नेहमी काळजी घ्या ,आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी असे बोललोच नव्हतो असे चालत नाही . कारण समोरचा लगेच तुमच्यासोबत झालेले संभाषण तुम्हाला ऐकवतो . त्यासाठी अनेक कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगले अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप म्हणजे अ‍ॅटोमेटीक कॉल रेकॉर्डर हे होय.अ‍ॅटोमेटीक कॉल रेकॉर्डरचे फिचर्स

1)क्लाऊड

तुमचे जर ड्रापबॉक्स किंवा गुगल ड्राईव्हवर अकाऊंट असले तर तुमचे अ‍ॅटोमॅटीक कॉल रेकॉर्डर तुमचे कॉल रेकॉर्डिंग त्यावर सेव्ह करेल. म्हणजे तुमच्या मेमरी कार्डवरील स्पेस यामुळे वाचू शकतो.

)रेकॉर्डिंग पाथ

तुमचे कॉल्स कोठे रेकॉर्ड करायचे म्हणजे इंटरनल मेमरी कार्डवर रेकॉर्ड करायचे की एक्स्टर्नल मेमरी कार्डवर रेकॉर्ड करायचे तसेच कुठल्या डिरेक्टरीमध्ये रेकॉर्ड करायचे हे देखील तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तुम्हाला परत शोधायला सोपे.

३) नोटीफिकेशन

यामध्ये स्मार्ट फोनवर नोटिफिकेशन बारमध्ये दाखविण्यासाठी न्यू कॉल आणि शो कॉलर डिटेल्स आणि आफ्टर कॉल असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी तुम्हाला नोटीफिकेशन हवे असल्यास त्याला सिलेक्ट करावे अन्यथा करू नये.

४)इनबॉक्स साइज

यामध्ये इनबॉक्स साइजचा अर्थ म्हणजे इनबॉक्समध्ये किती कॉल सेव्ह असावे असा होय. यामध्ये फ्री व्हर्जनमध्ये तीनशे कॉल रेकॉर्ड ठेवण्याची सोय आहे. तीनशेच्यावर कॉल रेकॉर्डिंग झाल्यास अगोदरचे कॉल रेकॉर्डिंग डिलीट होतात. त्यासाठी तुमचे काही महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग असल्यास दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये मुव्ह करून घ्यावे म्हणजे ते सेफ राहतील.

५)फिल्टर

यामध्ये रेकॉर्ड आॅल, इग्नोर आॅल आणि इग्नोर कॉन्टॅक्ट असे पर्याय आहेत. त्याचप्रमाणे कुठले कॉन्टॅक्ट वरून कॉल आल्यास रेकॉर्ड करायचे आणि कुठले कॉल इग्नोर करायचे हे तुम्ही ठरवू शकता किंवा रेकॉर्ड आॅल म्हणून सगळेच कॉल रेकॉर्ड करू शकता.

कॉल रेकॉर्डिंगचे महत्त्व

1)तुम्ही एखादी मोठी डील करता ,त्याच्या सर्व अटी आणि शर्ती तुम्ही समोरच्या पार्टीशी मोबाईलवर बोलून ठरवता. मात्र प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बैठकीला बसता तेव्हा समोरची पार्टी अचानक मी असे काही बोललोच नाही, असे म्हणते. तेव्हा तुमच्या स्मार्टफोनवर अ‍ॅटोमॅटीक रेकॉर्ड झालेले तुमचे संभाषण पार्टीला ऐकवून शकता .कदाचित तुमच्या डिलमध्ये लाखोंचा फायदा होऊ शकतो.

2)तुमचा काही व्यवसाय आहे आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांशी बोलून फिडबॅक घेता. अशावेळी अनेक तक्रारी ग्राहक करता. या सर्व तक्रारी ज्या तुमच्या स्मार्टफोनवर अ‍ॅटोमॅटिक रेकॉर्ड होतील त्या तुम्ही तुमच्या सेल्स आणि सर्व्हीस टिमला ऐकवून  तुमच्या ग्राहकाला समाधानी करू शकता. यामुळे साहजिकच तुमचा व्यवसाय वृद्धींगत होण्यास मदत होईल.

3)तुमच्या बॉसने तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट विषयी फोन करून बऱ्याच सूचना तसेच बदल सूचविले तर या अ‍ॅटोमॅटिक कॉल रेकॉर्डरमुळे तुम्हाला बॉसने काय काय सूचना किंवा बदल सांगितले हे लगेच तुम्ही तुमचे रेकॉर्ड झालेले संभाषण परत परत ऐकून बॉसच्या सूचनांचे न चुकता पालन करू शकता. कॉल रेकॉर्डिंगचे अगणित फायदे आहेत. मात्र फक्त उदाहरणदाखल वरील उदाहरणे दिली आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल