नवा ‘पब्जी’ खेळताना सावधान; डेटा चोरीची हाेण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:17 AM2021-06-25T08:17:34+5:302021-06-25T08:17:51+5:30

वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती चोरली जाण्याचा धोकाही आहे.

Be careful when playing the new ‘pubg’; Fear of data theft pdc | नवा ‘पब्जी’ खेळताना सावधान; डेटा चोरीची हाेण्याची भीती

नवा ‘पब्जी’ खेळताना सावधान; डेटा चोरीची हाेण्याची भीती

googlenewsNext

‘बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया’ हा खेळ ऑफिशिअली लाँच झाला नसला तरी एपीके फाइल्सचा वापर करून हा गेम खेळला जात आहे. गेल्या वेळी बंदी आल्याने या गेमची निर्माती असलेल्या क्राफ्टन कंपनीने टेन्सेंट कंपनीशी संबंध तोडल्याचा दावा केला.मात्र, अजूनही क्राफ्टन कंपनी टेन्सेंटच्या सर्व्हरवरच काम करत असल्याचे समजते. त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती चोरली जाण्याचा धोकाही आहे.

एपीके काय आहे?

  • एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज
  • अँड्रॉइड आणि गुगलच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एपीके असते
  • काही ॲप्स गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध नसतात. मात्र, ते एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड करता येते.
  • एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड होणारे ॲप्स बेटा स्टेजवर असतात.

सीएआयटीचे पत्र

पब्जीच्या नव्या भारतीय रुपाला अनेकांनी विरोध केला आहे.कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटी यांनी
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून ‘बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया’ गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. या खेळामुळे वापरकर्त्यांची माहिती इतर देशात पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे सीएआयटीचे म्हणणे आहे.
 

Web Title: Be careful when playing the new ‘pubg’; Fear of data theft pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.