शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

इंटरनेट वापरत असाल तर सावधान!! तुमची ही माहिती होतेय लीक... परदेशी कंपन्या घेऊ शकतात गैरफायदा

By पवन देशपांडे | Published: August 24, 2017 11:15 AM

जगातील अर्ध्याहून अधिक जनता वेगवेगळ्या कारणांसाठी रोज इंटरनेटचा वापर करतेय. रोज ईमेल चेक करणे.. मेल पाठवणे... सर्फिंग करणे अन् अनेक साइट्सवरून माहिती मिळवणे...

ठळक मुद्देप्रत्येक वेबसाइट तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे तुमच्या स्थळाची माहिती ब्राऊजरकडे पाठवते.तुम्ही कोणत्या देशात... कोणत्या भागात आहात याची माहितीही ब्राऊजर कंपनीला मिळते.

जगातील अर्ध्याहून अधिक जनता वेगवेगळ्या कारणांसाठी रोज इंटरनेटचा वापर करतेय. रोज ईमेल चेक करणे.. मेल पाठवणे... सर्फिंग करणे अन् अनेक साइट्सवरून माहिती मिळवणे... अशा अनेक गोष्टींसाठी इंटरनेट लागतेच. स्मार्ट मोबाइलमुळे तर आता सर्वांच्या हाती इंटरनेटच्या महाजालाची एक डोर पोहोचलेली आहे. पण हीच डोर तुमची सगळी माहिती लीक करू लागली तर... सावधान!! जगात हे असं घडू लागलंय. तुमची माहिती आता चोरली जाऊ लागली आहे आणि इतर कंपन्यांसाठी ती विकलीही जाऊ लागली आहे.- तुम्ही कुठे आहात?तुम्ही कोणत्या ठिकाणाहून इंटरनेटचा वापर करत आहात हे सहजरित्या ब्राऊजिंग कंपनीला कळत असते. प्रत्येक वेबसाइट तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे तुमच्या स्थळाची माहिती ब्राऊजरकडे पाठवते. तुम्ही कोणत्या देशात... कोणत्या भागात आहात याची माहितीही ब्राऊजर कंपनीला मिळते.  - तुम्ही वापरत असलेला कम्प्युटर, लॅपटॉप अन् मोबाइलब्राउझिंग करताना तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉप अन् मोबाइलची इत्यंभूत माहिती ब्राउझर कंपनीकडे जाते. तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणते सॉफ्टवेअर आहे, कोणत्या प्रकारचे हार्डवेअर आहे, कोणती आॅपरेटिंग सिस्टिम आहे याचीही माहिती कंपनीला जाते. एवढेच नाही तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपची बॅटरी किती चार्ज आहे हेही त्यांना त्यांच्या सर्व्हरवर कळते.- तुम्ही कोणते कनेक्शन वापरता?इंटरनेट वापरण्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीची सेवा घेत आहात, तुमच्या इंटरनेटचा डाउनलोडिंग आणि अपलोडिंगचा स्पीड किती आहे, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस काय आहे हेही कंपनीला कळते. म्हणजे एखादी कंपनी तुमच्या भागात इंटरनेट सेवा देणारी असेल तर त्या कंपनीला ही तुमची माहिती ब्राउझर कंपनीकडून सहज मिळू शकते.- तुमचे सोशल मीडिया अकाउंट राहात नाही ‘सिक्रेट’तुम्ही सोशल मीडियावर लॉग इन केल्यानंतर बºयाचदा आॅनलाइन असल्याचे कोणाला कळू नये म्हणून धडपडत असतो. पण, तुम्ही फेसबुकवर असा किंवा टिष्ट्वटरवर सगळ्या सोशल मीडियाच्या लॉगइनची माहिती ब्राउझर कंपनीला जातेच. त्यातून मग तुम्ही कोणता सोशल मीडिया जास्तीत जास्त वापरता याचा अंदाजही कंपनीला येतो. त्याचवेळी जर तुम्ही एखाद्या शॉपिंग साइटवर असाल किंवा एखाद्या पॉर्नसाइटवर असाल तर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर येणा-या जाहिरातीही शॉपिंग किंवा पॉर्नसंदर्भात यायला सुरुवात होते.- तुम्ही नेहमी नेहमी काय करता इंटरनेटवर?तुम्ही एकदा एखादी साइटवर गेल्यानंतर त्याच साइटसंदर्भातील सज्जेशन्स येत राहतात. तुम्ही नेहमी पाहात असलेल्या वेबसाइटही तुमच्यासाठी पुढे ठेवल्या जातात. पण हे तुमच्या सोईसाठी जसे आहे तसेच ब्राउझर कंपनीसाठीही फायद्याचे आहे. कारण यातून तुमच्या इंटरनेटवरील सर्फींगची माहिती कंपनीपर्यंत पोहोचते. याच डाटाचा वापर करून ते तुमच्यापर्यंत जाहिराती पोहोचवतात.त्यामुळे ब्राउझिंग करताना सावध राहाणे गरजेचे आहे. युसी ब्राउझर कंपनी भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांचा डाटा चोरत असल्याचे नुकतेच समोर आलेले आहे. पण ही एक कंपनी नाही जी ब्राउझर सेवा देऊ करते. अशा अनेक कंपन्या भारतात आहेत आणि त्यात नवनवी भर पडतच आहे. त्यामुळे आपण एखादे ब्राउझर वापरताना त्याच्या टर्म्स माहिती असू द्या.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया