शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

सावधान... #10YearChallenge स्वीकारताय?; तुम्ही मोठा धोका पत्करताय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:56 IST

#10YearChallenge इंटरनेट व सोशल मीडियावर जेव्हा आपण कोणताही फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करतो, तेव्हा तो फोटो...

ठळक मुद्देसोशल मीडियावर #10YearChallenge हा हॅशटॅग वापरून स्वतःचा दहा वर्षांपूर्वीचा आणि सध्याचा फोटो अपलोड केला जातोय.या माहितीवरून फेसबुक आपण पुढील दोन तीन वर्षांनी कसे दिसू ( चेहऱ्याची ठेवण) याचा अभ्यास तर नक्कीच करू शकते. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट अपलोड करताना प्रायव्हसी सेटिंग न विसरता पाहा.

>> तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट

२०१९ चा सुरुवातीला इंटरनेटवर सगळीकडे #10YearChallenge दिसायला लागले आहे. यात २००९ आणि २०१९ ( आत्ताचा  ) असे दोन्ही फोटो एकमेकांशेजारी लावले जातात आणि इंटरनेटवर सोशल मीडियावर #10YearChallenge हा हॅशटॅग वापरून अपलोड केले जात आहेत. या दोन फोटोंमुळे आपल्या जीवनात कशी प्रगती होत गेली, तसेच आपल्या जीवनामध्ये कसा बदल होत गेला हे लोकांच्या लक्षात येतं, जुने दिवसही आठवतात आणि 'चॅलेंज' पूर्ण केल्याचा त्यांना आनंद होत आहे. पण, हे चॅलेंज वरवर दिसतं तिथलं साधं-सोपं-सरळ नाही. त्यामुळे आपणही अशा प्रकारचे आव्हान स्वीकारत असाल, तर जरा थांबा. खालील मुद्द्यांचा विचार करा. 

तंत्रज्ञान

१. इंटरनेट व सोशल मीडियावर जेव्हा आपण कोणताही फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करतो, तेव्हा तो फोटो कोणत्या कॅमेरामधून काढला गेला आहे, कोणत्या लोकशनवरून काढला आहे अशा प्रकारची इतर महत्वाची माहितीसुद्धा त्या फोटोमधून मिळवता येते. प्रतिमा विश्लेषणामध्ये हे सहजपणे लक्षात येऊ शकते.२. फेसबुकवर जर आपला फोटो कोणी अपलोड केला तर फेसबुकमधील कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने प्रतिमा विश्लेषण करून आपल्याला अधिसूचना येते की तुमचा फोटो कोणत्या अकाउंटवरून अपलोड केला गेला आहे. तुम्हीच ती व्यक्ती असाल तर स्वतःला टॅग करा असे तुम्हाला सांगितले जाते. आपला पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो आपल्याच अकाउंटवरून अपलोड केला, तर फेसबुकच्या आपला जुना आणि नवा हे दोन्ही फोटो मिळतात. या माहितीवरून फेसबुक आपण पुढील दोन तीन वर्षांनी कसे दिसू ( चेहऱ्याची ठेवण) याचा अभ्यास तर नक्कीच करू शकते. इंटरनेटवर आज चेहरे ओळखण्याचे सॉफ्टवेअर अथवा दोन चेहऱ्यांपासून नवीन चेहरा तयार करणारे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत.

काय करावे?

१. स्वतःची वैयक्तिक माहिती अपलोड करू नये . २. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट अपलोड करताना आपण त्याची प्रायव्हसी सेटिंग पाहणे आवश्यक आहे .३. फोटो अपलोड करताना फोटोमधील मेटा डेटा काढून ती प्रतिमा सोशल मीडियावर अपलोड केली पाहिजे. 

'हे' धोके लक्षात घ्या!

१. चेहऱ्यावरून जर तुम्ही तरुण किंवा वृद्ध आहात हे दिसत असेल तर तुमच्या वयानुसार तुम्हाला जाहिराती दाखविल्या जाऊ शकतात. २. आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचे विविध प्रकारे हावभाव करत असतानाचे फोटो अथवा व्हिडिओ  सोशल मीडियावरती अपलोड केले असतील तर त्यात मोठा धोका असण्याची शक्यता  नाकारता येत नाही. कारण इंटरनेटवर आज काही अशी काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत की तुम्हाला कोडिंग न करता, व्हिडीओमध्ये असलेला चेहरा न घेता, आपल्याला हवा असेल तो नवीन दुसरा खोटा चेहरा लावू शकतो आणि नवीन खोटा व्हिडीओ तयार करता येऊ शकतो. ३. बऱ्याचदा फेसबुक वापरणाऱ्यांना प्रायव्हेट अथवा 'ओन्ली मी' असलेला डेटा चोरीला गेल्याचे उदाहरणे समोर आलेली आहेत.४. सोशल मीडियावर पटकन फोटो व्हायरल पण होऊ शकतो व त्याचा कोणी गैरवापर केला तर पटकन कळत पण नाही.

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम