शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Barcode Scanner App मध्ये आला व्हायरस, गुगलने प्ले स्टोरवरून हटवलं; फोनमधून लगेचच करा डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:01 IST

Barcode Scanner App : व्हायरसने युजर्संना इन्फेक्ट केल्यानंतर बारकोड स्कॅनरला गुगल प्ले स्टोरवरून हटवलं आहे.

नवी दिल्ली - Barcode Scanner अ‍ॅपचा वापर हा अनेकदा केला जातो. मात्र आता हे अ‍ॅप व्हायरसच्या जाळ्यात अडकलं आहे. Malwarebytes ने याबाबत माहिती दिली आहे. व्हायरसने युजर्संना इन्फेक्ट केल्यानंतर बारकोड स्कॅनरला गुगल प्ले स्टोरवरून हटवलं आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्संना खूप जास्त जाहिराती पाहायला मिळत होत्या. तसेच डिफॉल्ट ब्राउजरद्वारे ओपन होत होत्या. अ‍ॅपमध्ये व्हायरसची तक्रार करण्यात आल्यानंतर गुगलने लगेचच या अ‍ॅपला प्ले स्टोरवरून हटवलं आहे. मात्र हे अ‍ॅपला प्ले स्टोरवरून जवळपास एक कोटींहून जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे.

Malewarebytes च्या रिपोर्टनुसार, डिसेंबरच्या अखेरपर्यंत आमच्या फोरम युजर्सपैकी एक डिस्ट्रेस कॉल मिळणं सुरू झालं होतं. या युजर्संना जाहीराती दिसत होत्या. त्यांच्या डिफॉल्ट ब्राउजरद्वारे ओपन होत होत्या. यात विशेष म्हणजे कोणतंही अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात आलेलं नव्हतं. जे इन्स्टॉल होतं. त्यांना गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करण्यात आलं होतं. यानंतर एका Anon00 युजरनेमच्या युजरने जाहिराती बऱ्याच वेळापासून इन्स्टॉल बारकोड स्कॅनर अ‍ॅपवरून येत आहेत हे पाहिलं. या अ‍ॅपला गुगल प्ले स्टोरवर एक कोटीहून जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. 

व्हायरसला डिटेक्ट केले असून गुगलने याला प्ले स्टोरवरूनही हटवले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्संच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप खूप आधीपासून इन्स्टॉल होतं. डिसेंबरमध्ये एक अपडेट आल्यानंतर बारकोड स्कॅनर एक मॅलिशस अ‍ॅपमध्ये बदललं गेले. मिळालेल्या माहितीनुसार, हे अपडेट 4 डिसेंबर 2020 रोजी रोलआऊट करण्यात आले होते. या अ‍ॅप अपडेटमध्ये एक Android/Trojan.HiddenAds.AdQR कोड होते. ज्याने युजर्सचा आपला स्मार्टफोनचा डिफॉल्ट ब्राऊजरवर थर्ड पार्टी अ‍ॅड साइटवर रिडायरेक्ट होत होते. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अ‍ॅप असेल तर लगेचच डिलीट करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अलर्ट! QR कोड स्कॅन करून पेमेंट करताय?, वेळीच व्हा सावध नाहीतर...; अशी घ्या काळजी

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. एखाद्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर QR कोड स्कॅन करून पेमेंट करीत असाल तर वेळीच सावध होण्याची सध्या गरज आहे. दुकानदारला ऑनलाईन पैसे पाठवताना क्यूआर कोडचा वापर हमखास केला जातो. मात्र यामुळे फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आलं होतं. आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. डिजिटल देवाण घेवाण करत असतानाच फ्रॉडचे प्रमाण हे सर्वाधिक असते. 

Google चं 'हे' App 24 फेब्रुवारीपासून होणार बंद; जाणून घ्या, कसा ट्रान्सफर करायचा डेटा?

गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅप (Google Play Music) चा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आता एक बॅड न्यूज आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स याचा सर्वाधिक वापर करत असून 24 फेब्रुवारीपासून हे अ‍ॅप आता बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल आपल्या प्ले म्यूझिक (Google Play Music) अ‍ॅपला यूट्यूब म्यूझिक (YouTube Music) अ‍ॅपवरून रिप्लेस करत आहे. कंपनीने गेल्या वर्षी यासंबंधीची घोषणा केली होती. गेल्या 8 वर्षांपासून हे अ‍ॅप सुरू होतं. अँड्रॉईड़ युजर्संना हे अ‍ॅप उघडल्यानंतर कंपनीकडून शटडाऊनचा मेसेज मिळत आहे. मेसेजमध्ये युजर्संना 24 फेब्रुवारी 2021 पासून तुमचा सर्व डेटा रिमूव्ह करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन