शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

यू ट्युबवर आता दिसणार ब्रेकिंग न्यूज, डेस्कटॉप आणि मोबाईलवरही झालं उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:08 IST

सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेल्या यू ट्युबवर आता तुम्हाला ब्रेकिंगसुद्धा पाहता येणार आहेत.

नवी दिल्ली, दि. 21 - सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेलं यू ट्युबवर आता तुम्हाला ब्रेकिंगसुद्धा पाहता येणार आहेत. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. यू ट्युबनं ब्रेकिंग न्यूजसाठी नवं टॅब दिलं असून, त्याद्वारे तुम्हाला ब्रेकिंग पाहता येणार आहेत. यू ट्युब होमपेज आणि मोबाइल अॅपमध्ये एक वेगळं सेक्शन जोडण्यात आलं आहे. ज्यात जगभरातून येणा-या ब्रेकिंग न्यूज एक व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. हे फीचर पहिल्यांदा Android Policeमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे.मोबाईलमध्ये ट्रेंडिंगमधल्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे टॅब सापडणार आहे. या न्यूज टॅबमध्ये बार्सिलोनामधील दहशतवादी हल्ल्यांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, ब्रेकिंग न्यूजची ही सुविधा आयओएस आणि अँड्रॉइड डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल वापरकर्त्या युजर्ससाठी गुगल कंपनीने आपल्या अ‍ॅलो या मॅसेंजरची वेब आवृत्ती सादर केली होती. पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन करूनच याचा वापर करता येतो आहे.गेल्या अनेक दिवसांपासून गुगल अ‍ॅलो या मॅसेंजरची डेस्कटॉप आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आता कुणीही आपल्या संगणकावरील क्रोम या वेब ब्राऊजरमध्ये अ‍ॅलो मॅसेंजर वापरू शकेल. अर्थात यात एक ट्विस्ट आहे. म्हणजेच अँड्रॉइडचे स्मार्टफोन युजर्स याचा वापर करू शकतील. अर्थात डेस्कटॉप आवृत्तीसाठी अँड्रॉइड स्मार्टफोन हा निकष बर्‍याच जणांच्या लक्षात येणार नाही. तथापि, गुगल अ‍ॅलो वापरण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करावा लागणार असून, सध्या फक्त अँड्रॉइड स्मार्टफोनवरूनच ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर आयओएस प्रणालीसाठी ही सुविधा लवकरच मिळणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.