शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

WhatsApp युजर्स 'मेटा'कुटीला; कंपनीने दिलं स्पष्टीकरण, सांगितलं कधी सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 14:09 IST

WhatsApp down : मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवांमध्ये सध्या व्यत्यय येत आहे. मेटा प्रवक्त्याने कंपनी शक्य तितक्या लवकर सर्व्हिस रिस्टोर करण्यासाठी काम करत आहे असं म्हटलं आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅव्हॉट्सअ‍ॅप गेल्या तासाभरापासून बंद आहे. युजर्सना अ‍ॅपवर 'कनेक्टिंग' लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे ते कोणालाही मेसेज पाठवू शकत नाहीत. दुपारी 12 वाजल्यापासून युजर्सना ही अडचण येत असून ते कोणत्याही पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवू शकत नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपच्या मालकीची कंपनी मेटाने याबाबत आता माहिती दिली आहे. "काही युजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत" असं म्हटलं आहे. 

मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवांमध्ये सध्या व्यत्यय येत आहे. मेटा प्रवक्त्यांनी कंपनी शक्य तितक्या लवकर सर्व्हिस रिस्टोर करण्यासाठी काम करत आहे असं म्हटलं आहे. तसेच "आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी व्हॉट्सअ‍ॅप रिस्टोर करण्यासाठी काम करत आहोत" असं देखील प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. अनेकांना व्हॉट्सअ‍ॅप शिवाय करमत देखील नाही. फोटो, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपवरून सहज शेअर करता येतात. मात्र गेल्या तासाभरापासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झालं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं म्हटलं जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि पर्सनलवर देखील यामुळे मेसेजेस पाठवता येत नसल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी याबाबत ट्विट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा नेमकं कधी सुरू होणार याबाबत युजर्सकडून विचारणा करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर आता ट्विटरवर मीम्स देखील व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान