अॅपलने आपले नवे AirPods Pro 3 लॉन्च केले आहेत. महत्वाचे म्हणजे, हे प्रीमियम ऑडियो एक्सपेरिअन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. AirPods 3 Pro मध्ये कस्टम आर्किटेक्टर मिळते, यामुळे चांगला बास आणि क्लियर ऑडियो ऐकू येतो, असे कंपनीने म्हटले आहे.
या हेडफोनसोबत स्वेट आणि वॉटर रेसिस्टंन्स देण्यात आले आहे. यामुळे वर्कआउट आणि रनिंग सेशंस दरम्यान एअरपॉड्स खराब होण्याची भीती नसेल, असे कंपनीने म्हटले आहे.
AirPods Pro 3 मध्ये हार्ट-रेट सेंसिग फीचर -कंपनीने आपल्या या प्रीमियम ऑडिओ विअरेबलमध्ये खास हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर्स दिले आहेत. तसेच,यासाठी या बड्समध्ये सर्वात छोटे हार्ट-रेट सेंसरही देण्यात आले आहे. याच्या सहाय्याने युजर्स अपले वर्कआउट सेशनही ट्रॅक करू शकतात.
किती आहे किंमत? - कंपनीने भारतामध्ये AirPods Pro-3, 25900 रुपयांच्या किंमतीसह लाँच केला आहे. तसेच, यासाठी प्री-ऑर्डर देखील सुरू झाल्या आहेत. ग्राहकांना 19 सप्टेंबरपर्यंत याची डिलिव्हरी मिळायला सुरुवात होईल.