शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
2
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
3
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
4
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
5
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
6
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
7
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
8
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
9
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
10
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
11
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
12
Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
13
संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज
14
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
15
कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
16
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
17
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
18
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
19
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
20
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
Daily Top 2Weekly Top 5

Apple चा मोठा निर्णय! आता iPhone चे 4 नाही, तर 6 मॉडेल लॉन्च होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:30 IST

iPhone 18 एअर आणि iPhone 18 फोल्ड लॉन्च केला जाऊ शकतो.

अमेरिकन टेक कंपनी Apple 2007 पासून दरवर्षी आपल्या iPhone चे नवे मॉडेल लॉन्च करत आहे. नवीन मॉडेल्समध्ये काहीतरी अपग्रेड्स पाहायला मिळतात. पण, पुढील वर्षांपासून Apple 4 नाहीी, तर iPhone चे 6 मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्यावर्षी कंपनीने आपल्या iPhone 16 सीरीजच्या स्टँडर्ड डिझाईनमध्ये बदल केला होता. तसेच, ही सीरीज Apple Intelligence फीचर्ससह आली होती. यंदा अॅपल सर्वात पातळ आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे मॉडेल iPhone 16 Plus ला रिप्लेस करेल. 

4 ऐवजी 6 आयफोन लॉन्च होणार!अलिकडेच एक नवीन अहवाल समोर आला आहे, त्यानुसार, अॅपल पुढील 2022-27 मध्ये 4 ऐवजी 6 आयफोन मॉडेल लॉन्च करू शकते. यामध्ये, दोन नवीन मॉडेल्स आयफोन 18 एअर आणि आयफोन 18 फोल्ड जोडले जाऊ शकतात. एवढेच नाही तर कंपनी 2027 मध्ये आपला स्डॅंडर्ड आयफोन 18 देखील लॉन्च करू शकते. 2027 च्या सुरुवातीला आयफोन 18e सोबत तो लॉन्च केला जाईल.

पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात कंपनी आयफोन 18 एअर, आयफोन 18 फोल्ड, आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स लॉन्च करणार आहे. तर, 2027 च्या सुरुवातीला आयफोन 18 आणि आयफोन 18ई लॉन्च केला जाईल. अॅपलने गेल्या वर्षी 4 आयफोन मॉडेल लॉन्च केले होते. तर, या वर्षी कंपनीने आणखी एक नवीन मॉडेल आयफोन 16ई लॉन्च केला आहे. हे नवीन मॉडेल आयफोन एसई सीरिजची जागा घेईल. या वर्षी कंपनी आयफोन 17 एअर लॉन्च करण्याची तयारी करत आहे, जो पूर्णपणे पोर्टलेस आयफोन असेल. त्यामध्ये सिम कार्ड किंवा चार्जिंगसाठी कोणतेही पोर्ट दिले जाणार नाही.

iPhone 18 Fold संभाव्य फिचर्सआयफोन 18 सिरीजमध्ये आणखी एक नवीन मॉडेल आयफोन 18 फोल्ड जोडला जाऊ शकतो, जो कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन असेल. या मॉडेलबद्दल अनेक लीक्स देखील समोर आले आहेत. आयफोन 18 फोल्डमध्ये 8 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले असेल. यासह, 5.7 इंचाचा दुसरा म्हणजेच कव्हर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोल्डेबल आयफोनमध्ये फेस आयडी बायोमेट्रिक फीचर असेल. तसेच, कंपनी हा फोल्डेबल आयफोन अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरासह लॉन्च करू शकते. याशिवाय, ही सीरिज A20 प्रो बायोनिक प्रोसेसरसह येईल.

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचSmartphoneस्मार्टफोन