शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Apple WWDC 2022: दोन जबराट लॅपटॉप लाँच; असे आहेत MacBook Air 2022 आणि MacBook Pro चे फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: June 7, 2022 08:45 IST

Apple नं काल रात्री झालेल्या Apple WWDC 2022 इव्हेंटमधून MacBook Air 2022 आणि नवीन MacBook Pro लाँच केले आहेत.  

अ‍ॅप्पलनं आपल्या Apple WWDC 2022 इव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्सची घोषणा केली आहे. यात iOS 16, M2 प्रोसेसर, iPadOS 16, WatchOS 9 आणि macOS Ventura सह कंपनीनं MacBook Air 2022 आणि MacBook Pro लॅपटॉप देखील लाँच केले आहेत. दोन्ही मॅक बुक शानदार डिजाईन आणि खास फीचर्ससह बाजारात आले आहेत. दोन्ही लॅपटॉप्समध्ये M2 processor देण्यात आला आहे.  

Apple MacBook Air 

नवीन Apple MacBook Air मध्ये कंपनीनं MagSafe चार्जिंगची सुविधा दिली आहे. याच्या डिस्प्लेमध्ये एक नॉच देण्यात आला आहे. या मॅक बुकचा डिस्प्ले 13.6 इंचाचा आहे, जो liquid retina सह येतो. याचा डिस्प्ले एक बिलियन कलर्सला सपोर्ट करतो, ज्याचा अर्थ असा आहे की हा 10-बिट डिस्प्ले आहे. नवीन मॅक बुक एयर 2022 मध्ये 1080p रिजोल्यूशन असलेला वेबकॅम देण्यात आला आहे.  

स्पिकर आणि माईक डिस्प्ले आणि कीबोर्डच्या मधल्या भागात देण्यात आले आहेत. यात चार स्पिकर असलेली साउंड सिस्टम देण्यात आली आहे, जी Spatial audio ला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी Touch ID चा पर्याय देण्यात आला आहे.  

Apple MacBook Air साइलेंट फॅनलेस डिजाइनसह बाजारात येईल. नवीन मॅक बुक 18 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक आणि संपूर्ण दिवसांच्या बॅटरी लाईफसह येतो. युजर्स आता एक साथ दोन डिवाइस चार्ज करू शकतात. Apple मॅक बुक एयरमध्ये 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यात एक हेडफोन जॅक मिळतो.  

MacBook Pro 

अ‍ॅप्पल मॅक बुक एयर 2022 प्रमाणे नवीन मॅक बुक प्रो देखील M2 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हा नवीन चिपसेट देखील काल झालेल्या इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला आला आहे. MacBook Pro लॅपटॉपमध्ये कंपनीनं 13 इंचाच्या डिस्प्लेसह शानदार स्पेसिफिकेशन्स आणि दमदार फीचर्स मिळतात.  

किंमत आणि उपलब्धता 

M2 प्रोसेसर असलेल्या Apple MacBook Air ची किंमत 1099 डॉलर म्हणजे सुमारे 85,509 रुपयांपासून सुरु होते. तर M2 प्रोसेसरसह येणाऱ्या MacBook Pro ची किंमत म्हणजे सुमारे 1,01,067 रुपयांपासून सुरु होते. अचूक तारीख जरी समोर आली नसली तरी पुढील महिन्यात यांची विक्री होईल, असं कंपनीनं सांगितलं आहे.  

टॅग्स :Apple Incअॅपल