शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

Apple Watch Blast: मोबाईल आणि टीव्हीनंतर आता Apple Watchचा स्फोट? गरम होऊन फुटल्याचा युजरचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 14:29 IST

Apple Watch Blast: एका व्यक्तीने त्याची अॅपल वॉच गरम होऊन फुटल्याचा दावा केला आहे.

Apple Watch Blast: काही दिवसांपूर्वीच टीव्हीच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. यानंतर आता स्मार्टवॉचची बॅटरी फुटल्याची माहिती मिळतीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीने त्याच्या अॅपल वॉचची (Apple Watch) बॅटरी अति गरम होऊन फुटल्याचा दावा केलाय. न्यूज एजन्सी IANS ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, या घटनेची माहिती अॅपलला देण्यात आली आहे. यानंतर कंपनीने त्या व्यक्तीची स्वाक्षरी कागदपत्रांवर घेण्याचा प्रयत्न केला आणि माहिती सार्वजनिक करण्यास मनाई केली. 

AppleInsider च्या रिपोर्टनुसार, युजरने डॉक्युमेंटवर सही करण्यास नकार दिला. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, यूजरने सांगितले  होते की, त्याची अॅपल वॉच गरम झाल्याचा अलर्ट देत होती. त्याला वॉच सामान्यपेक्षा जास्त गरम असल्याचे जाणवले. यानंतर त्याला घड्याळच्या मागच्या बाजूला क्रॅक पडल्याचे दिसून आले.

नेमकं काय झालं?यानंतर त्याने तात्काळ अॅपल सपोर्टला माहिती दिली आणि चौकशीची मागणी केली. त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्यापूर्वी, अॅपल सपोर्टने त्या व्यक्तीला घड्याळाला हात न लावण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीही घड्याळ तापत होते. यानंतर डिस्प्लेचा चक्काचूर झाला. यानंतर त्या व्यक्तीने वॉच हातात घेताच, त्यातून कर्कश आवाज आला. यानंतर त्याने घड्याळ खिडकीतून बाहेर फेकले, त्यादरम्यान घड्याळाचा स्फोट झाला. 

प्रकरणाची चौकशी करणार या घटनेनंतर त्या व्यक्तीने अॅपलला याबाबत संपूर्ण माहिती दिली. यानंतर कंपनीने प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. लवकरच कंपनीचा माणूनस ती घड्याळ लॅबमध्ये घेऊन जाणार आहे. दरम्यान, याआधीही मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. मात्र, अॅपल वॉचची बॅटरी फुटल्याचे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलBlastस्फोटtechnologyतंत्रज्ञान