शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Apple ची जबरदस्त Iphone 12 सिरीज लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By हेमंत बावकर | Updated: October 14, 2020 09:05 IST

Apple iphone 12 launch: कंपनीने आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini) देखील लाँच केला आहे. हा फोन दोन स्क्रीन साईजमध्ये असून 5.4 आणि 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअ‍ॅपल कंपनीने पहिल्यांदाच 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहेत.अन्य कंपन्यांचे ५ जी स्मार्टफोन येऊन सहा ते 8 महिने झाले आहेत. आयफोन 12 मध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून अल्ट्रा वाईड, नाईट मोड देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेची मोठी कंपनी अ‍ॅपलने आयफोन 12 सिरीज लाँच केली आहे. यामध्ये ४ स्मार्टफोन लाँच केले असून सर्वात महागडे आयफोन 12 प्रो (iPhone 12 Pro) 999 डॉलर (73309.12 रुपये) आणि आयफोन 12 प्रो मॅक्स (iPhone 12 Pro Max) 1099 डॉलर (80647.37 रुपये) किंमतील बाजारात उतरविला आहे. 

महत्वाचे म्हणजे कंपनीने आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini) देखील लाँच केला आहे. हा फोन दोन स्क्रीन साईजमध्ये असून 5.4 आणि 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये सारे फिचर हे आयफोन 12 चेच आहेत. कंपनीचा दावा आहे की हा जगातील सर्वात स्लीम, छोटा आणि फास्ट 5 जी स्मार्टफोन आहे.  iPhone 12 mini च्या 5.4 इंच साईजचा व्हेरिअंट 699 डॉलरला (51294.37 रुपये) बाजारात उतरविला आहे. तर .  iPhone 12 mini चा 6.1 इंचाचा व्हेरिअंट 799 डॉलर (58632.62 रुपये) ला लांच करण्यात आला आहे. 

भारतात 30 ऑक्टोबरपासून विक्रीiPhone 12 आणि iPhone 12 mini 64GB, 128GB व 256GB व्हेरिअंटमध्ये 4 रंग उपलब्ध आहेत. तर iPhone 12 Pro आणि  iPhone 12 Pro Max 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिअंट आणि graphite, silver, gold आणि pacific blue रंगामध्ये उपलब्ध आहेत. अ‍ॅपलच्या आयफोन 12 सिरीजचे फोन 30 ऑक्टोबरपासून भारतात उपलब्ध होणार आहेत. 

आयफोन 12 चे स्पेसिफिकेशनअ‍ॅपल कंपनीने पहिल्यांदाच 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहेत. अन्य कंपन्यांचे ५ जी स्मार्टफोन येऊन सहा ते 8 महिने झाले आहेत. 5G मुळे आयफोनचा वेगही वाढला आहे. आयफोन 12 ला blue, red, black, white आमि green रंगात लाँच करण्यात आले आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये A14 Bionic processor प्रोसेसर आहे. तर आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहेत. यामध्ये मोठे सेन्सर आणि पिक्चर क्वालिटी उत्तम देण्यात आली आहे.

आयफोन 12 मध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून अल्ट्रा वाईड, नाईट मोड देण्यात आला आहे. वायरलेस फास्ट चार्जिंगसाठी मॅगसेफ (MagSafe) प्रणाली देण्यात आली आहे. 

होमपॅड मिनी अ‍ॅपलचे होमपॅड मिनी 99 डॉलर म्हणजेच 7,268 रुपयांना मिळणार आहे. हा अ‍ॅपलचा स्मार्ट स्पीकर आहे. यामध्ये आर्टिफिशीअल इन्टेलिजन्स वापरण्यात आली आहे. याद्वारे गेट लॉक करणे, लाईट बंद करणे आदी कामे करता येऊ  शकतात. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँच