शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Apple लवकरच स्वस्त आणि दमदार iPhone करणार सादर; 5G कनेक्टिव्हिटीसह होणार लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 19:36 IST

Apple यावर्षीची फ्लॅगशिप सीरिज सादर केल्यानंतर आता स्वस्त आयफोनची तयारी करत आहे. हा फोन iPhone SE नावाने बाजारात येणार ...

Apple यावर्षीची फ्लॅगशिप सीरिज सादर केल्यानंतर आता स्वस्त आयफोनची तयारी करत आहे. हा फोन iPhone SE नावाने बाजारात येणार आहे. रिसर्च फर्म TrendForce ने आगामी iPhone SE ची लाँच टाइमलाईन सांगितली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, Apple iPhone SE 3 नावाचा स्वस्त फोन 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल. रिसर्च फर्मनं हा अ‍ॅप्पलचा हा आगामी आयफोन 5G कनेक्टिव्हिटीसह मार्चमध्ये येईल, असं म्हटलं आहे.  

Apple iPhone SE 3 

Apple पुढीलवर्षी iPhone 14 लाईनअपमध्ये mini आयफोन सादर करणार नाही, त्याची जागा iPhone SE 3 घेईल,अशी माहिती काही रिपोर्ट्समधून मिळाली आहे. हा निर्णय iPhone Mini च्या कमी लोकप्रियतेमुळे घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच या नव्या आयफोनमध्ये कंपनी कमी किंमतीत चांगले स्पेक्स आणि फीचर्स देऊ शकते, अशी चर्चा आहे.  

आगामी iPhone SE 3 च्या डिजाइनमध्ये कंपनीनं कोणताही बदल केला नाही, असा दावा लोकप्रिय Apple अनॅलिस्ट मिंग-ची कू यांनी केला आहे. iPhone SE 3 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना HD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात होम बटनमध्ये Touch ID देण्यात येईल. अ‍ॅप्पलचा हा स्मार्टफोन लेटेस्ट A15 Bionic चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.

iPhone SE Plus चे लीक स्पेक्स   

iPhone SE Plus स्मार्टफोन 4.7 इंचाच्या एलसीडी डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात A13 Bionic किंवा Apple A14 Bionic चिप मिळू शकते. फोनच्या मागे 12 मेगापिक्सलचा iSight सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच 7 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. यातील कॅमेरा सिस्टम सिक्स पोर्टेट लाईट इफेक्ट, ओआयएस आणि स्मार्ट HDR 3 सह सादर केली जाईल. हा फोन IP67 रेटिंग आणि डस्ट अँड वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात येऊ शकतो. तसेच होम बटनमध्ये Touch ID मिळू शकते. ही लीक झालेली माहिती आहे, ठोस माहितीसाठी लाँचची वाट बघावी लागेल.  

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान