शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

Apple iPhone Event : अॅपलनं लॉन्च केला आयफोनचा 'बादशाह', iPhone X आतापर्यंतचा सर्वात हायटेक मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 01:34 IST

दशकपूर्तीनिमित्त अ‍ॅपल कंपनी आपल्या मेगा कार्यक्रमात तीन नवीन आयफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X यांचा समावेश आहे.  

सॅन फ्रान्सिस्को, दि. 12  : दशकपूर्तीनिमित्त अ‍ॅपल कंपनी आपल्या मेगा कार्यक्रमात तीन नवीन आयफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X यांचा समावेश आहे.  कुपेरटिनो येथील अॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. या सोहळ्यात आयफोनच्या मालिकेबरोबरच LTE सर्पोट असलेला अॅपल वॉच सीरिज 3 आणि 4 k अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सही लाँच करण्यात आला आहे. तसेच यावेळी ARKit-पावर्ड गेम 'द मशीन' बाजारात आणला गेला. 

आयफोन X हा अॅपल कंपनीचा या वर्षातला सर्वात महत्त्वाचा फोन असल्याचे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी यावेळी सांगितले. प्री-ऑर्डर 27 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि ते स्टोअरमध्ये 3 नोव्हेंबरपासून उपलब्द होण्यास सुरूवात होईल. कंपनीने हा फोन बाजारात आणण्यासाठी आतापर्यंतची सर्वात आक्रमक योजना तयार केली आहे आणि पहिल्याच दिवशी 60 देशांमध्ये पसरलेल्या अ‍ॅपल स्टोअरमध्ये हे उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.  हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ऑप्टिमाइजेशनमुळे आयफोन 7 पेक्षा आयफोन एक्सच्या बॅटरीची क्षमता दोन तास आधिक वाढलेली असेल. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात अॅपल मोबाइल मिळणार आहे. आयफोन एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.  आयफोन एक्समध्ये असलेल्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यामुळे अंधारातही फोटो काढता येणार.  64GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये आयफोन एक्स बाजारात मिळेल. 

नवीन iPhone X चे फेस आयडी फीचर हे जगभरातील सुमारे 15 हजार अभियंत्यांच्या कष्टाचे परिणाम आहे. याच्या मदतिने वापरकर्ता त्याच्या चेहऱ्याने आयफोन अनलॉक करू शकेल. हे फीचर डिव्हाइस पूर्णपणे सुरक्षित ठेवेल आणि डिजिटल पेमेन्टसाठी अॅपला सपोर्टदेखील करेल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे की, हे फीचर अंधारातही चेहऱ्याची ओळख करेल.

 आयफोन एक्सची वैशिष्ट्ये - - वायरलेस चार्जिगची सुविधा- मोबाईलकडे पाहिले तरी अनलॉक होणार- वॉटरप्रुफ- ‘होम बटण’ नसेल- फिंगर प्रिंट स्कॅनर’ - इन्फ्रारेड कॅमेरा (अंधारातही फोटो काढता येणार)- ग्लास डिझाइन- उत्कृष्ट फोटोग्राफी आणि 4K वीडिओग्राफी- ड्युअल कॅमेरा सेटअप- ऑग्मेंटेड रिएलिटी फीचर- FaceID उपलब्ध- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 

जानेवारी 2007 मध्ये पहिल्यांदाच अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ टीव्ही जॉब्स यांनी आयफोन लाँच केला होता. अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. आयफोनने 1000 डॉलरचा आकडाही ओलांडला आहे. 

लॉचिंगच्या कार्यक्रमापूर्वी स्टीव्ह जॉब्स थिएटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या आठवणींना उजाळा दिला.  स्टीव्ह जॉब्सच्या आवाजील एका क्लिपने या सुरुवात झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर कंपनीचे टीम कुक अवतरले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टिव्ह जॉब्जचे शब्द, त्याचा आवाज काळजाला भिडणारा असतो, असं सांगताना टीम कुक यांचे डोळे पाणावले. आता आपण ख-या अर्थाने स्टिव्हच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. पुढे म्हणाले की,  आगामी काळात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात आयफोन असेल. एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता आहे. 

या वर्षाअखेर पर्यंत अ‍ॅपलचे मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. 75 एकर जमीनीवर अ‍ॅपलचे स्टिव्ह जॉब्स स्पेसशिप आहे, यामध्ये 9 हजाराहून अधिक वृक्ष आहेत. कुपेरटिनो येथील अ‍ॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अ‍ॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला. 

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple TVअ‍ॅपल टिव्हीApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X