शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Apple Event iphone 13: अ‍ॅपलकडून आयफोन १३ सीरिज लॉन्च; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 00:13 IST

Apple Event iphone 13: अ‍ॅपलकडून बहुप्रतिक्षित १३ सीरीज लॉन्च; फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स

कॅलिफॉर्निया: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीनं आयफोनची बहुप्रतिक्षित १३ सीरीज लॉन्च केली आहे. दमदार फीचर्ससह आयफोन १३ सीरिज सादर करण्यात आली आहे. यात एकूण ४ फोन आहेत. स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स कॅमेरा, जगातील सर्वात वेगवान सीपीयू ही आयफोन १३ ची वैशिष्ट्यं आहेत. नव्या फोनमध्ये ए१५ बायॉनिक चिपसेट आहे. त्यामुळे हा फोन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ५० टक्के अधिक वेगानं चालेल असा कंपनीचा दावा आहे.

आयफोन १३ मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आली आहेत. स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स ड्युएल कॅमेरा सिस्टम असलेला हा फोन पाच रंगांमध्ये (गुलाबी, लाल, निळ्या, मिडनाईट, स्टारलाईट) उपलब्ध असेल. यामधीय ब्राईटनेस २८ टक्के जास्त असेल. आयफोन १३ सीरिजमध्ये एकूण ४ फोन (आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स) आहेत. या फोनमध्ये ओएलईडी आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय शक्तिशाली ए१५ बायॉनिक चिप असेल.

आयफोन १३ मध्ये आणखी काय?- ६ कोर सीपीयू. आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये इतक्या क्षमतेचा सीपीयू देण्यात आलेला नाही.- ४ कोर जीपीयू. त्यामुळे ग्राफिक्स वेगवान होणार. १५.८ ट्रिलियन ऑपरेशन प्रति सेकंद क्षमता.- पॉवरफुल कॅमेरा सेटअपमुळे कोणत्याही परिस्थितीत उत्तम फोटो.- आयफोन १३ मध्ये ड्युएल रियर कॅमेरा. १२ मेगापिक्सल वाईड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर. सिनेमॅटिक मोडची सुविधा.- ऑटोमॅटिक फोकस बदलण्याची सुविधा- फोनमध्ये आधीच्या तुलनेत जास्त चांगली बॅटरी. आधीच्या तुलनेत २.५ तास जास्त चालणार. - आयफोन १३ मिनीची किंमत ६९९ डॉलर; आयफोन १३ ची किंमत ७९९ डॉलर; आयफोन १३ प्रोची किंमत ९९९ डॉलर, आयफोन १३ प्रो मॅक्सची किंमत १०९९ डॉलर- आयफोन १३ हा १२८, २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल- प्रो मॉडेल ४ फिनिशमध्ये उपलब्ध असेल. कंपनीनं फ्रंट पूर्णपणे नव्यानं डिझाऊन केला आहे. नॉच आधीच्या तुलनेत लहान करण्यात आला आहे. - आयफोन १३ प्रोमध्ये कंपनीनं कॅमेरा सिस्टममध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल केला आहे. यात टेलिफोटो, वाईड आणि एक अन्य कॅमेरा सेन्सर दिला आहे.

टॅग्स :Apple Incअॅपल