शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Apple Event 2023 : एकदम भन्नाट! Apple चे पहिलेवहिले १००% कार्बन न्यूट्रल वॅाच लाँच, आता Siri देणार हेल्थ डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:21 IST

मंगळवारी अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान कंपनीनं आपली अ‍ॅपल वॉच सीरिज ९ लाँच केली.

जगभरातील अनेक लोकांची नजर अ‍ॅपलच्या इव्हेंटवर असते. विशेषकरून अ‍ॅपलचे फॅन्स यावर लक्ष ठेवून असतात. मंगळवारी अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान कंपनीनं आपली अ‍ॅपल वॉच सीरिज ९ लाँच केली. टीम कुक यांनी अ‍ॅपल इव्हेंटची सुरूवात करत हे इव्हेंट केवळ आयफोन आणि अ‍ॅपल वॉचवरच असेल असं स्पष्ट केलं. यासोबतच त्यांनी यापूर्वीच्या इव्हेंटमध्ये लाँच केलेल्या मॅकबुक आणि अन्य मॅक प्रोडक्ट्सच्या बाबतीत माहिती देत अ‍ॅपल व्हिजन प्रोबाबतही माहिती दिली.

अ‍ॅपलनं इव्हेंटची सुरुवात करतानाच Apple Watch 9 ची घोषणा केली. यामध्ये युझर्सना S9 चिप पाहायला मिळणार आहे. तसंच अ‍ॅपल वॉच वापरून सिरीच्या (Siri) मदतीनं हेल्थ डेटाही मागता येणार आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ इंग्रजी आणि मंडारियनमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच सीरिज ९ मध्ये यापूर्वीच्या तुलनेत उत्तम डिस्प्ले देण्यात आलाय. याशिवाय नव्या फीचरच्या मदतीनं तुम्ही सहजरित्या आयफोनही शोधू शकणार आहात.

नवं फीचरअ‍ॅपल वॉच सीरिज ९ मध्ये कंपनीनं नवं फीचर दिलं आहे. आता एकाच हाताच्या मदतीनं तुम्हाला अ‍ॅपल वॉच वापरता येईल. तुम्ही ज्या हातात घड्याळ घातलंय, त्याच हाताचं इंडेक्स फिंगर आणि अंगठ्यानं डबल टॅप करून अनेक फीचर्स कंट्रोल करता येणार आहेत. कंपनीनं या फीचरला डबल टॅप नाव दिलंय. अ‍ॅपल वॉच पाच रंगांमध्ये उपलब्ध होईल.

अ‍ॅपलच्या उत्पादनांत शून्य कार्बन उत्सर्जनाची संकल्पना अंगीकारण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. २०३० पर्यंत, कंपनीची सर्व उत्पादनं नेट झिरो इम्पॅक्ट ऑन नेचरचा भाग असतील. म्हणजे कंपनी कार्बन न्यूट्रल होईल. यावेळी अ‍ॅपलनं आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक नवीन बँड जोडले आहेच. यासाठी कंपनीनं Nike आणि इतर कंपन्यांशी कोलॅब केलंय.Apple Watch Ultra 2 लाँचकंपनीने गेल्या वर्षी Apple Watch Ultra लाँच केलं होतं. यावेळी याचं नेक्स्ट जनरेशन लाँच करण्यात आलंय. यामध्ये तुम्हाला मोठी स्क्रीन आणि वॉच ९ चे सर्व फीचर्स मिळतील. यावर तुम्हाला मॉड्युलर अल्ट्रा नावाचा एक एक्सक्लुझिव्ह वॉच फेस मिळेल, जो दिवसा आणि रात्रीच्या वेळी अशा दोन्ही परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने काम करेल.किती असेल किंमतकंपनीनं Apple Watch SE च्या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत २४९ डॉलर्स निश्चित केली आहे. तर Apple Watch Series 9 साठी ३९९ डॉलर्स आणि Apple Watch Ultra 2 साठी ७९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. यासाठी आजपासून प्री बुकिंगही सुरू करण्यात आलंय.

टॅग्स :Apple Incअॅपल