शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

Apple Event 2023 : मास्टरक्लास! iPhone 15 लॅान्च; जबरा कॅमेरा, गेमिंग पावर अन् टाइप-सी पोर्ट; किंमतही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:32 IST

कंपनीनं अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान iPhone 15 आणि iPhone 15 Plus लाँच केले. पाहा काय आहे खास

जगभरातील अनेक लोकांची नजर अ‍ॅपलच्या इव्हेंटवर असते. विशेषकरून अ‍ॅपलचे फॅन्स यावर लक्ष ठेवून असतात. मंगळवारी अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान कंपनीनं आपली अ‍ॅपल वॉच सीरिज ९ लाँच केली. यानंतर कंपनीनं आपली बहुप्रतीक्षीत iPhone 15 सीरिज लाँच केली. कंपनीनं अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान iPhone 15 आणि iPhone 15 Plus लाँच केले.iPhone 15 हा 48MP च्या मेन कॅमेऱ्यासोबत येईल. याशिवाय यात अन्य फीचर्सही मिळतील. समोरील बाजूलाही आता नवं डिझाईन मिळणार आहे. कंपनीनं नॉच काढून टाकली असून नॉन प्रो व्हेरिअंटमध्येही आता डायनॅमिक आयलंड डिस्प्लेचा वापर करण्यात आलाय. याचाच अर्थ आता नॉच ऐवजी पंच होल कटआऊट मिळेल.

A16 Bionic चिपसेटकंपनीनं नव्या आयफोन १५ सीरिजमध्ये युझर्सना नवा 48MP चा मेन कॅमेरा दिलाय. यामध्ये कंपनीनं A16 Bionic चिपसेटचा वापर केलाय. यापूर्वीच्या सीरिजमध्ये केवळ प्रो व्हेरिअंटमध्ये हा चिपसेट देण्यात आला होता. नॉन प्रो मॉडेल्सही यापूर्वीच्या तुलनेत आता चांगले परफॉर्मन्स देऊ शकणार आहेत. यामध्ये उत्तम बॅटरी बॅकअपही मिळेल. याशिवाय कंपनीनं यात वायर आणि वायरलेस दोन्हीप्रकारचे कनेक्टिव्हीटी पर्याय दिलेत. एसओएस फीचरकॉलमध्ये मशीन लर्निंगचा वापर केला जाणार आहे. या फीचरच्या मदतीनं तुम्ही फोनवर नॉइज कॅन्सलेशनचा वापर करू शकता. म्हणजेच तुमच्या सभोवताली कितीही गोंगाट असला तरी कॉलदरम्यान तो तुम्हाला ऐकू येणार नाही. याशिवाय कंपनी आपल्या SOS आणि सॅटेलाइट कॉलिंग फीचर्सनाही आणखी उत्तम करत आहे. कंपनीनं यात इमर्जन्सी रोड साईट असिस्टंट फीचरही दिलंय. ज्याच्या मदतीनं तुम्ही सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे तुमचा इमर्जन्सी मेसेज पाठवू शकाल. सॅटेलाइट फीचर दोन वर्षांसाठी मोफत उपलब्ध असेल.

टाईप सी पोर्टकंपनीनं आपल्या नवीन आयफोन १५ सीरिजमध्ये USB टाइप-सी दिलंय. याच्या मदतीनं इयरबड्स, आयफोन आणि अन्य प्रोडक्ट्सही चार्ज करता येतील असं कंपनीनं म्हटलंय.

किती असेल किंमतकंपनीनं आयफोन १५ सीरिजच्या किंमतीची घोषणा केलीये. iPhone 15 च्या बेस मॉडेलची किंमत ७९९ डॉलर्स असेल. तर iPhone 15 Plus ची किंमत ८९९ डॉलर्स पासून सुरू होईल. कंपनीनं भारतीय बाजारपेठेतील या फोनच्या किंमतीची घोषणा केली नाही.iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max कंपनीने यामध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर केला आहे. यामध्ये बेझल्स देखील कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्हाला मोठी स्क्रीन मिळेल. ही सीरिज 6.1-इंच आणि 6.7-इंच स्क्रीन मध्ये उपलब्ध असेल. हे स्क्रीन साईज तुम्हाला अनुक्रमे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये मिळतील.प्रो व्हेरिअंटमध्ये नवा चिपसेटकंपनीने प्रो वेरिएंटमध्ये अॅक्शन बटण दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. या बटणाचा वापर अनेक कामांसाठी कस्टमाईज करता येऊ शकतो. याशिवाय प्रो सीरिजमध्ये कंपनीनं A17 बायोनिक चिपसेट दिली आहे. तसंच हा स्मार्टफोन फोन USB Type-C पोर्टसह उपलब्ध असेल.iPhone 15 Pro मध्ये जबरदस्त कॅमेरायामध्ये 48MP प्रायमरी लेन्ससह कॅमेरा सेटअप देण्यात आलंय. यामध्ये तुम्हाला लो लाईटमध्ये चांगले फोटो क्लिक करण्याचं फीचर मिळेल. याशिवाय यात 3X टेलिफोटो लेन्स देण्यात आलीये. मॅक्स व्हेरियंटमध्ये 5X ऑप्टिकल झूम फीचर असेल. कंपनीनं यात यामध्ये 12MP टेलिफोटो लेन्सही दिली आहे. यासोबतच यूजर्सना एक उत्कृष्ट मॅक्रो कॅमेरा मिळेल.

टॅग्स :Apple Incअॅपल