अॅपलच्या खास कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमातून अॅपल अनेक नवी उत्पादनं लॉन्च करणार आहे. यामध्ये आयपॅड, आयफोन्सचा समावेश आहे. अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. जूनमध्ये झालेल्या एका सोहळ्यात अॅपलनं नव्या स्मार्टवॉचची घोषणा केली होती. त्यामुळे अॅपलनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्मार्टवॉचची नवी सीरिजच्या लॉन्चिंगनं केली. LIVE UPDATES:- अॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लॉन्च; रक्तातील ऑक्सिजन अवघ्या १५ सेकंदांत मोजण्याची सुविधा; सिंगापूरातल्या कोरोना वॉरियर्सना नवं वॉच दिलं जाणार
- अॅपल वॉच एसई (Apple Watch SE) लॉन्च; एसईमध्ये एस५ चीपसेटचा वापर; ई-सिमला सपोर्ट करणार; किंमत २७९ अमेरिकन डॉलर्सपासून सुरू