शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

Apple कंपनीने १८५ तेलगू कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढले; टीका होताच..., कोणीच समर्थन करू शकले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:48 IST

अ‍ॅप्पलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळविण्यासाठी करोडो लोक तरसत असतात. पण ज्यांना नोकरी मिळाली ते ती टिकवू शकत नाहीत, इमाने इतबारे करू शकत नाहीत.

जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅप्पल कंपनीने १८५ भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यामुळे कंपनीवर टीका होत होती. यावर कंपनीने या कर्मचाऱ्यांना का काढून टाकले त्याचे कारण दिले आहे. अ‍ॅप्पलने तेलगू भाषिक असलेल्या या कर्मचाऱ्यांना काढले आहे. 

तेलगू कर्मचाऱ्यांनाच नोकरीवरून काढल्याने भाषिक वाद किंवा भारतीय असल्याचा आकस आदी गोष्टींवरून कंपनीवर सोशल मीडियातून टीका करण्यात येत आहे. परंतू, हा वाद नसून या कर्मचाऱ्यांनी कंपनीसोबत फ्रॉड केला आहे, तसेच कर चोरी केली आहे. या कारणामुळे अमेरिकेच्या आयकर विभागाने कंपनीला या कर्मचाऱ्यांबाबत सूचित केले होते. यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

अ‍ॅप्पल एक खास योजना राबविते, जिचे नाव Apple Matching Gifts Program असे आहे. याचा या तेलगू कर्मचाऱ्यांनी गैरवापर केला होता. अमेरिकेच्या आयएरएसने याचा भांडाफोड केला आहे. तेलगू भाषिक लोकांनी एकमेकांना सांगून याचा गैरफायदा उठविला होता. यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली आहे. 

काही कर्मचारी अनियमितता करून अ‍ॅप्पलच्या गिफ्ट प्रोग्रॅमचा लाभ उठवत असल्याचा संशय अ‍ॅप्पलच्या फायनान्स विभागाला आला होता. त्यांनी आयआरएसला याबाबत कळविले होते. यात आयआरएसने १८५ कर्मचाऱ्यांचे आयकर रिटर्न तपासले तर यात गडबड केल्याचे समोर आले. या १८५ तेलगू कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापकांपासून एंट्री लेव्हल एक्झिक्युटिव्हपर्यंत सर्वांचा समावेश होता. 

टॅग्स :Apple IncअॅपलAmericaअमेरिका