आज टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ॲपलचा बहुप्रतीक्षित वार्षिक मेगा इव्हेंट पार पडत आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपली नवी Apple Watch 11 लाँच केली आहे. या वॉचमध्ये अथवा घड्याळामध्ये कंपनीने 5G सह अनेक आत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, ही आतापर्यंतची सर्वात चांगली वच असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
"आतापर्यंतची बेस्ट स्मार्ट वॉच, 5G सपोर्ट" -यावेळी आपल्या या नव्या वॉचमध्ये कंपनीने अॅडव्हॉन्स्ड 5G दिले आहे. याशिवाय, हाय ब्लड प्रेशरसंदर्भात कंपनीने यावेळी एक विशेष फीचर दिले आहे. जे वापरकर्त्यांना नोटिफिकेशन देऊन Hypertension संदर्भात सतर्क करेल. याच बरोबर Apple Watch Series 11 मध्ये 5G मॉडेम देण्यात आले आहे. ही वॉच जबरदस्त बॅटरी लाइफसह येते. या वॉचसह आपल्याला Liquid Glass डिझाइनही मिळेल. यात हार्ट रेट, मेंटल हेल्थ सह अनेक हेल्थ फीचर्स मिळतील.
हेही वाचा - iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
Sleep Score फीचर -WHOOP बँड प्रमाणेच आता Apple Watch मध्येही स्लीप स्कोर दिसेल. यापूर्व्ही सॅमसंगनेही आपल्या स्मार्ट वॉचमध्ये Sleep Score फीचर दिले होते. स्लीप स्कोर आपल्या झोपण्याचा पॅटर्न आणि स्लीप स्टेजचा अभ्यास करून, एक स्कोर देतो. यावरून आपली झोप किती पूर्ण होत आहे, हे समजते.