Apple लवकरच आपले वायरलेस AirPods 3 लाँच करण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही आठवड्यात हे एअरपॉड्स लाँच केले जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच्या लिक झालेल्या फोटोंवरून Apple AirPods 3 च्या फीचर्सचा खुलासा झाला आहे. या वायरलेस एअरपॉड्स व्यतिरिक्त कंपनी नवं डिव्हाईस Apple Music HiFi लाँच करणार हे. हे डिव्हाईस Spotify HiFi प्रमाणे काम करेल.नव्या जनरेशनच्या इयरबड्समध्ये एअरपॉड्स प्रो ची डिझाईन लँग्वेज पाहायला मिळेल. परंतु यात काही बदलही दिसतील. चार्जिंग केस एअरपॉड्स प्रो शी मिळताजुळताच असेल. तसंच याची साईजही छोटी असेल. याशिवाय याचा चार्जिंग इंडिकेटर समोरच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी यात अॅक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन फिचर पाहायला मिळणार नाही. याशिवाय यात वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्सही देण्ययात येणार नाही. परंतु Apple AirPods 3 साठी कंपनी एका नव्या चिपसेटवर काम करत असल्याचंही समोर आलं आहे. नव्या चिपसेटचं नाव U1 असू शकतं. यात उत्तम बॅटरी लाईफ, रेज आणि अन्य दुसरे अतिरिक्त फिचर्स मिळतील. Apple AirPods 3 मध्ये प्रो प्रमाणे टच कंट्रोलही मिळतील. याशिवाय Dolby Atmos चा सपोर्टही मिळू शकतो. Apple AirPods 3 च्या लाँच डेट्सबद्दल अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये हे एअरपॉड्स लाँच होण्याची शक्यता आहे. Apple AirPods 3 हे AirPods Pro पेक्षा २० टक्के स्वस्त असल्याचा दावा एका लिकमध्ये करण्यात आला आहे. याची किंमती १५० ते १९९ डॉलर्सपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लवकरच लाँच होणार Apple AirPods 3; लाँचपूर्वीच फीचर्स लिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 13:28 IST
Apple AirPods 3 सोबत कंपनी Apple Music HiFi लाँच करण्याच्या तयारीत.
लवकरच लाँच होणार Apple AirPods 3; लाँचपूर्वीच फीचर्स लिक
ठळक मुद्देApple AirPods 3 सोबत कंपनी Apple Music HiFi लाँच करण्याच्या तयारीत.पूर्वीच्या एअरपॉड्सच्या तुलनेत करण्यात आलेत बदल