शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

Fact Check: Amul देत आहे का 6000 रुपये गिफ्ट? जाणून वायरल WhatsApp मेसेजमागील सत्य 

By सिद्धेश जाधव | Updated: October 12, 2021 13:12 IST

Amul Anniversary Scam: WhatsApp वर एका लिंकसह Amul कडून 6000 रुपये मिळणार असल्याचा मेसेज वायरल होत आहे. हा मेसेज धोकादायक आहे आणि सायबर एक्सपर्ट्सनुसार याद्वारे तुमचा डेटा चोरून फसवणूक देखील होऊ शकते.  

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp चा वापर संवाद साधण्यासाठी केला जातो. परंतु याच अ‍ॅपचा वापर फसवणुकीसाठी आणि गुन्हेगारीसाठी केला जातो. बऱ्याचदा व्हॉट्सअ‍ॅपवर पैसे, गिफ्ट, मोफत प्रोडक्ट, मोफत रिचार्ज इत्यादी स्वरूपाचे मेसेजेस येतात. अनेक युजर्स मोफत वस्तू मिळवण्याच्या नादात हे मेसेजेस फॉरवर्ड करतात. परंतु नंतर हे मेसेज फ्रॉड असल्याचे समजते. असेच काहीसे आता भारतातील प्रसिद्ध कंपनी अमूलच्या नावावर होत आहे. जर व्हॉट्सअ‍ॅपवर अशी एखादी लिंक आली असेल, ज्यात 6000 रुपये मिळण्याचा दावा केला जात आहे, तर सावध व्हा.  

Amul अ‍ॅनिव्हर्सरी गिफ्ट लिंक  

व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक वायरल होत आहे, जिच्यावर क्लिक केल्यावर एक वेबसाईट ओपन होते. या वेबसाईट पेजवर Amul चा लोगो आहे. त्याखाली “Amul 75th Aniversary” आणि त्यानंतर मोठ्या अक्षरात “Congratulation” लिहिण्यात आले आहे. त्यानंतर पेजवर काही प्रश्नांची उत्तरे दिल्यास तुम्हाला 6000 रुपये मिळवण्याची संधी मिळेल असे सांगण्यात आले आहे.  

फक्त प्रश्न आणि उत्तरांवर हा फ्रॉड थांबत नाही. त्यानंतर ही लिंक तुमच्या 20 मित्रांना किंवा 5 ग्रुप्सना पाठवा म्हणजे तुम्हाला 6000 रुपये मिळतील, असे सांगण्यात येते. हा फ्रॉड जिवंत करण्यासाठी या पेजवर इतर काही लोकांनी आपल्याला 6000 रुपये मिळाल्याचा दावा कमेंट्समध्ये केला आहे.  

अमूलने दिले स्पष्टीकरण 

जेव्हा अमूलने ट्विट करून या प्रकरणाची दखल घेतली तेव्हा हे प्रकरण उघड झालं. अमूलने एक ट्वीटकरून हा एक बनावट मेसेज असल्याचे म्हटले आहे. Whatsapp आणि इतर सोशल मीडियावर ही SPAM लिंक शेयर केली जात असून यावर क्लिक न करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. तसेच अमूलने अशी कोणतीही मोहीम सुरु न केल्याची माहिती देखील कंपनीने ट्विटरवरून दिली आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप