शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Amazon ने वाढवलं नेटफ्लिक्स, हॉटस्टारचं टेन्शन; आधीपेक्षा स्वस्त Prime Video चा नवा प्लॅन, पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:46 IST

Amazon Prime Video Mobile Subscription : Amazon ने भारतात नवीन Prime Video Mobile Subscription प्लॅन लॉन्च केला आहे.

Amazon ने भारतात नवीन Prime Video Mobile Subscription प्लॅन लॉन्च केला आहे. नावाप्रमाणेच, Prime Video Mobile Edition प्लॅन हा केवळ मोबाईल डिव्हाईससाठी सिंगल युजर प्लॅन आहे. नवीन प्राइम व्हिडीओ प्लॅनची ​​किंमत 599 रुपये आहे आणि त्याची वैधता एक वर्ष आहे. म्हणजेच ग्राहक 599 रुपयांमध्ये वर्षभर मोबाईलवर प्राइम व्हिडीओ कंटेन्ट पाहू शकतात. Amazon Prime Video चं मोबाईल व्हर्जन एअरटेलच्या भागीदारीत गेल्या वर्षी सादर करण्यात आलं होतं आणि ते फक्त Airtel युजर्ससाठी उपलब्ध होतं. या प्लॅनची ​​किंमत 89 रुपये प्रति महिना पासून सुरू होते आणि युजर SD गुणवत्तेत Amazon Prime वर कंटेन्ट पाहू शकतात.

Amazon ची नवीन प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. म्हणजेच फक्त एअरटेल ग्राहकांपुरते मर्यादित नाही. या नवीन प्लॅनमध्ये, युजर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कंटेन्ट स्टँडर्ड डेफिनिशन (SD) गुणवत्तेत पाहू शकतील. जर युजर्सना हाय डेफिनिशन (HD) गुणवत्तेत सामग्री पाहायची असेल, तर त्यांना Amazon Prime चं स्टँडर्ड व्हर्जन अपग्रेड करावं लागेल ज्याची किंमत प्रति महिना 179 रुपये आणि प्रति वर्ष 1499 रुपये आहे.

Amazon च्या ओरिजनल कंटेन्टशिवाय, युजर्स 599 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये थेट क्रिकेट सामने देखील पाहू शकतील. याशिवाय प्राइम व्हिडिओसाठी आयएमडीबी पॉवर्ड एक्स-रे आणि ऑफलाइन पाहण्यासाठी शो डाउनलोड करणे यासारखी फीचर्स उपलब्ध असतील. असे दिसते की Amazon नेटफ्लिक्स आणि डिस्ने+ हॉटस्टारच्या मोबाईल प्लॅनला हे टक्कर देऊ शकतं. Amazon Prime Video Mobile Edition ची किंमत प्रति महिना 50 रुपये आहे तर Netflix च्या मोबाईल प्लॅनची ​​किंमत 149 रुपये प्रति महिना आहे. 

डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसाठी, प्रति वर्ष 499 रुपये, प्रति महिना 41 रुपये मोजावे लागतात. लेटेस्ट Amazon Prime Mobile Edition प्लॅन खरेदी करायचा असल्यास, युजर्स Android किंवा iOS एपवर साइन अप करू शकतात किंवा PrimeVideo.com वर जाऊन प्लॅन सबस्क्राइब करता येईल. याशिवाय युजर्स त्यांची इच्छा असल्यास भविष्यात कधीही दुसर्‍या प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकतात. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान