शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:52 IST

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी खूप खर्च केला होता. आता त्या कंपन्या पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. ॲमेझॉनचा हा नियम त्याचाच एक भाग आहे.

ॲमेझॉन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम आणला आहे. आता कर्मचाऱ्यांना कंपनीने दिलेला मोबाईल फोन कामासाठी किती वापरला आणि स्वतःच्या खासगी कामासाठी किती वापला हे सांगावे लागणार आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना फोनच्या बिलासाठी दर महिन्याला ५० डॉलर (सुमारे ४००० रुपये) देते. आता, जर कोणी फोनचा वापर खासगी कामांसाठी जास्त करत असेल, तर त्यांना मिळणाऱ्या या पैशांमध्ये कपात केली जाईल. म्हणजेच आता खासगी वापरासाठी मोबाईल वापरला तर पैसेही कमी मिळणार आहेत, याबाबत बिझनेस इनसायडरच्या एक अहवालातून माहिती समोर आली आहे.

महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी खूप खर्च केला होता. आता त्या कंपन्या पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. ॲमेझॉनचा हा नियम त्याचाच एक भाग आहे. कंपनीचे नवीन सीईओ (मुख्य अधिकारी) अँडी जॅसी हे संपूर्ण कंपनीच्या कामाची पद्धत बदलत आहेत. ते  खर्चावर नियंत्रण आणत आहेत.

फक्त फोनच नाही, तर इतर गोष्टींवरही लक्ष 

कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेरगावी जायचे असेल, तर आधी 'त्या प्रवासातून कंपनीला काय फायदा होईल' हे सांगावे लागणार आणि त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच जेवणाचा खर्चसुद्धा आता तपशीलवार लिहून द्यावा लागणार आहे. कंपनीचे पैसे म्हणजे आपले पैसे म्हणून खर्च करायचा आहे असं कंपनीचे मत आहे. 

या नियमांमुळे कर्मचारी नाराज असल्याचे समोर आले. 'कंपनी आमच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर खूप जास्त लक्ष ठेवत आहे. यामुळे आपली नोकरी सुरक्षित आहे की नाही, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यांच्या मते, कंपनीकडून मिळणारा फोन ही एक सामान्य सुविधा आहे, त्याचा असा हिशोब ठेवणे योग्य नसल्याचे मत कर्मचाऱ्यांचे आहे.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनbusinessव्यवसाय